जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दुचाकीच्या अपघातात इसम ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत काल भाकरे वस्तीजवळ एका दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत येवला तालुक्यातील मुखेड येथील इसम संजय भाऊराव जिरे (वय-४०) यांचे निधन झाले आहे.या घटनेबाबत मयताचा भाऊ सोमनाथ भाऊराव जिरे (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत संजय भाऊसाहेब जिरे हे शुक्रवार दि.२६ मार्च रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास धामोरी रवंदे रस्त्याने धामोरी शिवारातून आपल्या बजाज प्लॅटिना या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१५,एच.ए.७८५३) हिच्यावरून जात असताना भाकरे वस्तीजवळ कोणातरी अज्ञात वाहनाने व त्यावरील चालकाने त्यांना जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी केले त्यात त्यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सोमनाथ जिरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपले बंधू हे शुक्रवार दि.२६ मार्च रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास धामोरी रवंदे रस्त्याने धामोरी शिवारातून आपल्या बजाज प्लॅटिना या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१५,एच.ए.७८५३) हिच्यावरून जात असताना भाकरे वस्तीजवळ कोणातरी अज्ञात वाहनाने व त्यावरील चालकाने त्यांना जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी केले व दुचाकीच्या नुकसानींस कारणीभूत होऊन कोणतीही खबर न देताच पसार झाला आहे.या अपघातात आपल्या बंधूंचे निधन झाले आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१०३/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ)(ब) १७७ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी. बोठे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close