जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जगावेगळे

बाळू मामांची मेंढरे कोपरगाव तालुक्यात ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर -(शिवाजी गायकवाड)

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांत प्रसिद्ध असलेली संत बाळूमामांची मेंढरे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात कासली रोडलगत आलेली असून भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

संत बाळूमामांनी आपल्या मेंढरांच्या माध्यमातून अनेक लोकांची मदत केली आणि त्यांना सद्‍मार्गावर आणले.बाळू मामा यांच्या चरित्रात अनेक चमत्कार आणि गोष्टी सांगितलेल्या आहेत,ज्या त्यांच्या भक्तीचे प्रतीक आहेत.बाळू मामा आणि त्यांची मेंढर ही कथा महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यात खूप लोकप्रिय आहे.वर्तमानात त्यांचे मेंढरे कोपरगाव तालुक्यातील कासली रस्त्यालगत संवत्सर शिवारात राजेंद्र नेहे यांच्या शेतात आलेले आहे.

बाळू मामा आणि त्यांची मेंढर ही एक प्रसिद्ध कथा आहे.बाळू मामा हे एक मोठे संत होते, ज्यांना मेंढपाळ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या मेंढरांच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली आणि त्यांना सद्‍मार्गावर आणले.बाळू मामा हे एक मोठे संत होते,जे आपल्या भक्ती आणि सेवेसाठी ओळखले जात होते. बाळू मामा यांना मेंढपाळ म्हणून ओळखले जात होते,कारण ते मेंढ्या पाळत असत.त्यांनी आपल्या मेंढरांच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली आणि त्यांना सद्‍मार्गावर आणले.बाळू मामा यांच्या चरित्रात अनेक चमत्कार आणि गोष्टी सांगितलेल्या आहेत,ज्या त्यांच्या भक्तीचे प्रतीक आहेत.बाळू मामा आणि त्यांची मेंढर ही कथा महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यात खूप लोकप्रिय आहे.वर्तमानात त्यांचे मेंढरे कोपरगाव तालुक्यातील कासली रस्त्यालगत संवत्सर शिवारात राजेंद्र नेहे यांच्या शेतात आलेले आहे.त्यांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.पालखीचे कारभारी संत सद्गुरु बाळूमामा राष्ट्रीय आदर्श सेवेकरी पुरस्कार प्राप्त गुंडोपंत पाटील हे असल्याची माहिती आहे.

श्री संत बाळूमामाच्या पालखीत एकूण ०३ हजार मेंढर तसेच ४०० शेळ्या सांभाळ करण्यासाठी १०० सेवेकरी सर्व सेवेकरी मोफत सेवा करत आहेत.हा कारभार पाहण्यासाठी पालखीला एक मुख्य सेवेकरी असतो त्याला कारभारी म्हणतात आदमापुर संत सद्गुरु बाळूमामाच्या एकूण १९ पालख्या असून त्या महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये भ्रमण करत असतात. पालख्यासोबत ना मालक नसतो फक्त सेवेकरी असतात पालखी वरती दररोज सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी नऊ वाजता आरतीचा कार्यक्रम असतो आरतीसाठी ०२ ते०३ हजार भावी दररोज जमा होतात.आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचा लाभ होत असतो जो भाविक मनोभावे सेवा करतो त्या भाविकास बाळूमामा पावन होतो अशी श्रद्धा आहे.दररोज बाळूमामा यांचेवर प्रवचन किर्तनरुपी सेवा देखील केली जात आहे.
  संवत्सर या ठिकाणी दिनांक २६ एप्रिल पासून ते ०२ मे  पर्यंत पालखी राहणार आहे.त्या कालावधीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले असून त्याचबरोबर नामदेवराव पाटील गोदावरी दूध संघाच अध्यक्ष राजेश परजणे यांनी आरतीस हजेरी लावली आहे.भाविक भक्तासाठी महाप्रसादाची पंगत दिली जात असून महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्या अध्यक्ष विवेक कोल्हे यांचेसह संवत्सर ग्रामपंचायत सरपंच सुलोचना दिलीपराव ढेपले उपसरपंच विवेक कृष्णराव परजणे यांनी हजेरी लावली आहे.

सदर कार्यक्रमासाठी राजेंद्र नेहे,दिलीप ढेपले,पन्ना नेहे,शंकरराव नेहे,भाऊसाहेब दहिने,आप्पासाहेब जाधव,संभाजी दहिने, यादव दहिने,गोरख जाधव,मोहनराव ढेपले, शरद शिंदे,नारायण शिंदे,पांडुरंग शिंदे आदींसह
संवत्सर गावातील धनगर समाज बांधव व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close