जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

२.७५ लाखांची भर दुपारी चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गत काही माहिन्यात चार कार चोरी होऊन त्यांचा तपास लागलेला नसताना काल दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास वारी,कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी भर दुपारी चोरट्यांनी विविध दागिने आणि रोख रकमेसह २.७५ लाखांवर हात साफ केला असल्याचा गुन्हा नवनाथ पाराजी पवार (वय-५९) यांनी कोपरंगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तालुक्यात येवून धाडी टाकत असून हि बाब स्थानिक पोलिसांना खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.विशेष म्हणजे गुटखा चोर तर बेताल झाले असून जामिनावर सुटल्यावर त्यांचे सहकारी पोलिसांच्या नाकावर टिचून टाकळी नाक्यावर थेट भर चौकात फटाके वाजवून अवैध व्यावसायिकांचे राजरोस स्वागत करताना दिसत आहे.यावर राजकीय नेते कोणीही बोलायला तयार दिसत नाही.तर विरोधकांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलीस विभागावर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.कार आणि दुचाकी चोऱ्या या नित्याच्या झाल्या आहेत.अन्य अनेक चोऱ्या सातत्याने सुरु आहे.त्यांची बातम्यांची शाई वाळते न वाळते तो पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील कालिंदीनगर या उपनगरात एक मारुती स्विफ्ट डिझायर गाडी चोरी करून आपला प्रताप दाखवला आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तालुक्यात येवून धाडी टाकत असून हि बाब स्थानिक पोलिसांना खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.विशेष म्हणजे गुटखा चोर तर बेताल झाले असून जामिनावर सुटल्यावर त्यांचे सहकारी पोलिसांच्या नाकावर टिचून टाकळी नाक्यावर थेट भर चौकात फटाके वाजवून अवैध व्यावसायिकांचे राजरोस स्वागत करताना दिसत आहे.यावर राजकीय नेते कोणीही बोलायला तयार दिसत नाही.तर विरोधकांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता रक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असताना यावर कोणीही बोलायला तयार दिसत नाही त्यामळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात नुकतीच भर दुपारी घडली आहे.

सदर घटनेत फिर्यादी शेतकरी नवनाथ पाराजी पवार यांनी म्हटलं आहे की,”दि.१२ मे रोजी दुपारी १२.४५ ते १.१५ वाजेच्या सुमारास आपण आपल्या शेतात असताना अज्ञात आरोपीनी आपल्या व आपले मित्र भाऊसाहेब व्यंकटराव काजळे यांच्या कान्हेगाव येथील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कापटाचे लॉकर मध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यात ५००,२००,१०० च्या नोटा अंदाजे २ लाखांची रक्कम तर चार तोळे वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे दागिने त्यात दीड तोळा वजनाचे दोन नेकलेस तसेच दोन पाने,दोन सोन्याच्या अंगठ्या,अंदाजे एक तोळा जणांचे असा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी हे आपले शेतीचे काम आटोपून आल्यावर सदर घटना उघड झाली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या चोरीच्या घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२४४/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,३८० अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close