जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

०८ ऑगस्टपूर्वी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा-…यांचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदाराने ०८ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपला एन्यूमरेशन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी नुकतेच केले आहे.

  

“मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत आधार असून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूकपणे मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.या विशेष मोहिमेद्वारे मतदार यादीतील नाव,पत्ता,छायाचित्र तसेच इतर तपशीलांची पडताळणी केली जात आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या बूथ लेव्हल ऑफिसर (बी.एल.ओ.) यांना आवश्यक सहकार्य करून एन्यूमरेशन फॉर्म वेळेत भरावा”- आ.विवेक कोल्हे,कोपरगाव.

  भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एस.आय.आर.) २०२६ अंतर्गत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.या मोहिमेनुसार १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.मतदार यादी पुनरीक्षण २०२६ चे वेळापत्रकघरोघरी जाऊन पडताळणी ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुमच्या घरी प्रत्यक्ष येऊन माहिती व स्वगणनापत्र गोळा करत आहेत.मात्र अद्याप राज्यात 40-45 टक्केच काम झाले असून हे कमी असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आ.कोल्हे यांनी हे आवाहन केले असल्याचे मानले जात आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी  पत्रकात पुढे म्हटले आहे की,”मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत आधार असून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव अचूकपणे मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.या विशेष मोहिमेद्वारे मतदार यादीतील नाव,पत्ता,छायाचित्र तसेच इतर तपशीलांची पडताळणी केली जात आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या बूथ लेव्हल ऑफिसर (बी.एल.ओ.) यांना आवश्यक सहकार्य करून एन्यूमरेशन फॉर्म वेळेत भरावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

  अनेकदा अपूर्ण माहिती,चुकीचा पत्ता किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी अडचणी निर्माण होतात.अशा समस्या टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराने स्वतःच्या नावाची,छायाचित्राची आणि इतर सर्व माहितीची खात्री करून घ्यावी.जर कोणतीही त्रुटी आढळून आली तर ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधावा.मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे.हा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि ०८ ऑगस्ट २०२६ पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.तसेच प्रत्येक नागरिकाने ही माहिती आपल्या कुटुंबीय,नातेवाईक,शेजारी आणि इतर पात्र मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांनाही वेळेत एन्यूमरेशन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही शेवटी आ.कोल्हे यांनी केले आहे.






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close