दळणवळण
विकास कामाच्या गुणवत्तेत तडजोड नको-आ.काळेंचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोनाच्या साथीच्या प्रतिकूल कालखंडात विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.या निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोपरगाव येथे गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
“कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून हि विकासकामे पूर्ण करून घ्यावीत”-आ.आशुतोष काळे.
या बैठकीत पंचायत समिती अंतर्गत प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा त्यांनी आढावा घेतला.नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून हि विकासकामे पूर्ण करून घ्यावीत.त्याबाबत संबंधित ठेकेदारास आदेश द्यावेत.दिलेल्या मुदतीत विकास कामे पूर्ण करतांना संबंधित ठेकेदाराकडून विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड होता कामा नये.यासाठी सर्व विकासकामे गुणवत्तापूर्वक करून घ्यावीत. कोणत्याही विकासकामात हलगर्जीपणा आढळून आल्यास खपवून घेतला जाणार नाही अशा ईशारा आ.काळे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,सोनाली रोहमारे,प्रसाद साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,अनिल कदम,सुधाकर होन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राहुल जगधने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर.पाटील,उपअभियंता प्रशांत वाकचौरे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,अभियंता दिगंबर वाघ,पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.