जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील मस्जिद,कब्रस्थांसाठी भरीव निधी देणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुस्लीम बांधवांचा अतिशय आनंदाच्या असणाऱ्या “रमजान ईद” सणाचे औचित्य साधत कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानसाठी स्थानिक विकास निधीतून भरीव निधी देणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानच्या अंतर्गत सोयी सुविधांसाठी भरीव निधी दिला त्याप्रमाणेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील इतर गावातील मस्जिद व कब्रस्थानच्या विकासासाठी देखील टप्प्या टप्याने निधी देणार आहे-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यातील बहुतांश गावातील मुस्लीम समाजाच्या मस्जिद व कब्रस्थानचा प्रश्न मागील काही वर्षापासून अनुत्तरीत असून त्या मस्जिद व कब्रस्थानच्या विकासासाठी निधी मिळावा याबाबत आ. काळे सातत्याने पाठपुरावा करीत असून यापूर्वी चांदेकसारे,चास नळी व शिरसगाव-सावळगाव या गावातील कब्रस्थानसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला असून यामध्ये चांदेकसारे १० लाख, चास नळी ८ लाख व शिरसगाव-सावळगावसाठी ७ लाख असा एकूण २५ लाख रुपये निधी दिला आहे. कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानमध्ये मुस्लीम बांधवांना येत असलेल्या अडचणींची दखल घेवून आपल्या स्थानिक विकास निधीतून “रमजान ईद” च्या पूर्व संध्येला नूर इस्लाम मस्जिद (मर्कज), नवीन कब्रस्तान (१०५), जुना कब्रस्तान (मौलवी गंज) कोर्ट रोड व मदरसा मिफ्ता उल उलुम (खडकी) साठी भरीव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले असून लवकरच मस्जिद व कब्रस्थानमधील अंतर्गत विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानच्या अंतर्गत सोयी सुविधांसाठी भरीव निधी दिला त्याप्रमाणेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील इतर गावातील मस्जिद व कब्रस्थानच्या विकासासाठी देखील टप्प्या टप्याने निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मागील वर्षी देखील रमजान ईदच्या सणावर कोरोनाचे सावट होते व यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. मुस्लीम बांधवांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता योग्य ती काळजी घ्यावी व रमजान ईदची पवित्र नमाज घरातूनच अदा करावी असे आवाहन करून सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईद” च्या शेवटी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close