आरोग्य
लोहगावात कोरोना लसीकरण मोहीम संपन्न
न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कोरोना लसीकरण मोहीम नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी होणारी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लसीकरणाचा पुरवठा कमी प्रमाणात येत असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन व होत असल्यामुळे कित्येक नागरिकांना लसीकरण केंद्रावर पहाटे पाच वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत होते परंतु येणारी लस १०० ते १२० पर्यंत व गर्दी २०० ते ३०० पर्यंत व्यवस्था होत असल्यामुळे कित्येक नागरिकांना बिगर लसीकरणचे माघारी जाण्याची वेळ येत होती ती आता दूर होणार आहे.
राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लसीकरणाचा पुरवठा कमी प्रमाणात येत असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन व होत असल्यामुळे कित्येक नागरिकांना लसीकरण केंद्रावर पहाटे पाच वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत होते परंतु येणारी लस १०० ते १२० पर्यंत व गर्दी २०० ते ३०० पर्यंत व्यवस्था होत असल्यामुळे कित्येक नागरिकांना बिगर लसीकरणचे माघारी जाण्याची वेळ येत होती.एकाच वेळी केंद्रावर गर्दी झाल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता होती.त्याच प्रमाण लसीपासून वंचित राहिलेल्यांना नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत होत्या.परंतु मात्र शासनाने ‘गाव तेथे लसीकरण’ करण्यात यावे असे नियोजन केल्यामुळे नागरिकांमध्ये होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.कोल्हार बु.केंद्राअंतर्गत पाथरे बुद्रुक हनुमंतगाव,लोहगाव,तिसगाव,बाभळेश्वर,कोल्हार बु.,भगवतीपुर या गावाचा समावेश होता.त्यामुळे लसीकरणं केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.गर्दीमुळे कोरोना वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन गाव तेथे लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.लसीकरण करण्यासाठी कोल्हार बु.केंद्रातील डॉ.संजय घोलप,डॉ.हेमंत निर्मळ,आरोग्य सेविका सौ.भनगडे सौ.ओहोळ.सौ.सलालकर,आशा कर्मचारी सुनिता नरोडे,रिबेका गोडगे,माया कदम,मिना बनकर,राजश्री इनामके,परिचारिका शुभांगी क्षेत्रे यांनी योग्य नियोजन करून व सुरक्षित अंतर पाळून उभं लसिकरण केले आहे.
लसीकरण केंद्राचे उद्घाटन डॉ.संजय घोलप सरपंच स्मिता चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे,माजी संचालक भाऊसाहेब चेचरे,माजी संचालक लहानु चेचरे,शांताराम चेचरे,सतिश गिरमे,सोपान चेचरे,पत्रकार कोडीराम नेहे,रावसाहेब चेचरे,किशोर गिरमे,अंत्रे शशिकांत,दयाबाई बोर्ड,रमाबाई सोनवणे,आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.