जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम !    

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
                   
   कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे परिसरात शुक्रवार,दि.५ जून रोजी प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असून शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-सिन्नर महामार्गालगत उभारण्यात आलेल्या हॉटेल,घरे तसेच इतर अनधिकृत ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईचे साईभक्त आणि प्रवाशांनी स्वागत केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील सुरू असलेले कारवाई दिसत आहे.

“अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहनांच्या रांगा लागतात आणि रुग्णवाहिका,अग्निशमन दल अशा तातडीच्या सेवांना जाण्यास अडथळा निर्माण होतो.सुरक्षित पादचारी मार्ग नसल्यामुळे वृद्ध,लहान मुले आणि महिलांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.परिणामी अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र अशा कारवाईचे धाडस 15 वर्षापूर्वी 10 मार्च 2011 रोजी तत्कालीन प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी आणि प्रशासनाने दाखवले होते.त्यानंतर प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी ते दाखवले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    रस्त्यावरील अतिक्रमणे ही भारतात खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.यामुळे वाहतूक कोंडी,अपघातांचे प्रमाण आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते.या समस्येचे गांभीर्य आणि त्यावर कायदेशीररित्या कशा प्रकारे कारवाई करता येऊ शकते याबाबत अधिकारी बऱ्याच वेळा नागरिकांचे ऐकून घेतात मात्र कारवाईच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते.परिणामी दुकानांचा विस्तार,फेरीवाले आणि अनधिकृत गाळ्यांमुळे चालण्यासाठी जागा उरत नाही.रस्त्यांवर किंवा फुटपाथवर अनधिकृतपणे वाहने उभी केल्याने रस्ता अरुंद होतो.रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर किंवा शासकीय जागेवर पक्की घरे,शेड किंवा धार्मिक स्थळे उभारली जातात.परिणामी अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहनांच्या रांगा लागतात आणि रुग्णवाहिका,अग्निशमन दल अशा तातडीच्या सेवांना जाण्यास अडथळा निर्माण होतो.सुरक्षित पादचारी मार्ग नसल्यामुळे वृद्ध,लहान मुले आणि महिलांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.परिणामी अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र अशी कारवाईचे धाडस 10 मार्च 2011 रोजी तत्कालीन प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी आणि प्रशासनाने दाखवले होते.परिणामी कोपरगाव शहरातील प्रवासी आणि रस्त्यांना मोकळा श्वास घेता आला होता.नगरपरिषद याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचे या अतिक्रमणधारकांचे मोठ्या प्रमाणावर फावत असते.मात्र सामान्य नागरिकांचा हकनाक बळी जात असतो.त्याची दखल घेतली तर अपघात कमी होतात.अशीच दखल शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी आज घेतली आहे.

अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान ठेवलेला चोख बंदोबस्त दिसत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील चौफुलीवर काही जणांनी ठिय्या मांडला होता.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साईभक्त दिंड्या आणि प्रवाशांचा मोठा राबता असतो.उत्सव कालखंड आणि शनिवार,रविवार व गुरुवार या दिवशी तर ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असते.परिणामी त्या भागात अपघात वाढले होते.त्याची दखल घेऊन आज प्रांताधिकारी आहेर यांनी आपला फौजफाटा घेऊन पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांची मदत घेऊन हे अतिक्रमण हटविले असल्याची गोड बातमी हाती आली आहे.

    या मोहिमेदरम्यान कोपरगाव तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार प्रफुलिता सातपुते यांनी कारवाईचे नेतृत्व केले आहे. तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने योग्य समन्वय साधून कारवाई पार पाडली आहे.

    महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनेक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.या कारवाई दरम्यान प्रशासनाचा मोठा ताफा उपस्थित होता.प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीतपणे पार पडली आहे.परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात प्रशासनाला यश आले असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close