व्यापार विषयक
कोपरगाव व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष पदी पुन्हा कोयटे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत”करण्याची घोषणा केली असून याच पार्श्वभूमीवर ‘आत्मनिर्भर कोपरगाव’ या संकल्पनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील व्यवसाय-उदिमास प्रोत्साहन देण्याचे व कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना स्थानिक बाजारपेठेतूनच माल खरेदी करण्याचे आवाहन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे नूतन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची विस्तारित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.त्यात अध्यक्ष म्हणून पुन्हा एकमताने ओमप्रकाश कोयटे यांची अध्यक्ष म्हणून तर कार्याध्यक्ष म्हणुन भुसार मालाचे व्यापारी अजीत लोहाडे,किराणा व्यापारी सुधीर डागा तर उपाध्यक्ष म्हणून कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल झंवर, साखर व्यापारी राजेंद्र बंब,चहा व्यापारी नारायणशेठ अग्रवाल तर राम ठिबकचे संचालक केशवराव भवर यांची निवड करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची विस्तारित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.त्यात अध्यक्ष म्हणून पुन्हा एकमताने ओमप्रकाश कोयटे यांची अध्यक्ष म्हणून तर कार्याध्यक्ष म्हणुन भुसार मालाचे व्यापारी अजीत लोहाडे,किराणा व्यापारी सुधीर डागा तर उपाध्यक्ष म्हणून कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल झंवर, साखर व्यापारी राजेंद्र बंब,चहा व्यापारी नारायणशेठ अग्रवाल तर राम ठिबकचे संचालक केशवराव भवर यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदार पदी खुबाणी ज्वेलर्स चे तुळशीदास खुबाणी तर सचिवपदी बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स प्रदीप साखरे,सहसचिव पदी इंडस्ट्रीयालिस्ट नरेंद्र कुर्लेकर व फर्टीलायझरचे व्यापारी राम थोरे यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले कि,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिने असलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत कोपरगाव तालुक्यातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कोरोना योद्ध्याप्रमाणे कार्य करून एकप्रकारे देश सेवा केलेली आहे. प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने घेतली परंतु व्यापाऱ्याचे देखील नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. कोपरगाव तालुक्यात घरगुती व मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरु करण्यासाठी व्यापारी महासंघ यापुढे प्रयत्न करणार आहे.
या वेळी उपाध्यक्ष मोहनलाल झंवर,उपाध्यक्ष नारायण अग्रवाल,सचिव प्रदीप साखरे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या विस्तारात खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आले. धारणगाव रोड शाखा प्रतिनिधीपदी गुलशन होडे-धारणगाव रोड,राजेश खैरे-रवंदा,कोळपेवाडी-राजेन्द्र गोलेचा व श्री.भळगट,वारी-बाबुशेठ कलंत्री, श्री.लालवाणी,पोहेगाव-डी.आर.औताडे,सागर मखीजा,शिरसगाव-विनोद भागवत,शिंगणापूर-दिलीप धाडीवाल,राजू कुऱ्हे,चासनळी-रविराज चांदगुडे, निळकंठ चांदगुडे,जेऊर कुंभारी-नितीन शिंदे,धामोरी-आबा भाकरे,अमर माळी,येसगाव-राहूल गायकवाड,वैभव भंडारी यांची तर संचालक पदी सर्वश्री आशुतोष पटवर्धन,रमेश शिरोडे,केशवराव साबळे,कृष्णाशेठ उदावंत,सतीष पांडे,संजय भन्साळी,योगेश बागुल,चंद्रकांत नागरे,चेतन खुबाणी,टिलक अरोरा, सत्येन मुंदडा,बबलू राजपाल,बबलू वाणी,उमेश धुमाळ,रामू पटेल,हेमचंद्र भंवर,सचिन ठोळे,सुमित भट्टड, सतीश कोतकर, किरण शिरोडे, अबुजर शेख, संजय दुशिंग व नसीर सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.