जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोकमठाणात पतीची आत्महत्या तर वाचविणाऱ्या पत्नीचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) याचे व त्याची पत्नी सविता खोतकर (वय-२५) या दोघांचे अज्ञात कारणावरून रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास वाद निर्माण होऊन त्या रागातून त्याने थेट विहिरीकडे धाव घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यास वाचविण्यास गेलेली पत्नी कविता खोतकर हिनेही त्या पाठोपाठ विहिरीत उडी मारल्याने घरातील बहीण धावत त्यांना वाचविण्यासाठी गेली असता तिंचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली मात्र सावधानता बाळगत जवळच्या ग्रामस्थानी तातडीने दोर सोडल्याने तिला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी विहिरीतील पाणी काढण्यास उशीर झाल्याने हे पतिपत्नी वाचविण्यात मात्र ग्रामस्थांना अपयश आल्याने त्यानां मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांना रात्री आरडा-ओरडा झाल्याने जाग आली तेव्हां त्यांना पुढे मुलगा पाठोपाठ त्याची पत्नी व त्यांच्या पाठोपाठ मयताची बहीण पळताना दिसून आले.पुढे मुलाने थेट विहिरीत उडी मारली व त्याला वाचविण्यास गेलेली त्याची पत्नीने त्या पाठोपाठ विहिरीत उडी मारली व या दोघाना वाचविण्याच्या प्रयत्नांत मयताच्या बहिणीचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली.मात्र या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जागे होऊन तेही मदतीसाठी पळत आले त्यातील काहींनी ताबडतोब विहिरीत दोर सोडल्याने पडलेली मयताची बहीण वाचविण्यात त्यांना यश आले.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील रेलवाडी या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर खोतकर हा आपल्या आई,वडील,एक बहीण,एक दोन वर्षाची मुलगी असा परिवार राहत होता.वडील शेळी पालन करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत.मयताचे साधारण चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मयत ज्ञानेश्वर खोतकर याच्या पोटात काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुखू लागल्याने त्याने आपल्या पत्नीसह कोपरगाव येथील खाजगी दवाखान्यात धाव घेतली होती.ते उपचार करून घरी आल्यावर झोपले असताना अचानक मयत तरुण हा रात्री दहा वाजेच्या सूमारास बाहेर ओरडत आला व त्या पाठोपाठ त्याची पत्नी ओरडत येत असताना आपल्या सासूला तक्रार वजा सुरात,” आत्या बघा हे ऐकत नाही,बाहेर पळू राहिलेत”हा आवाज ऐकून वडील व आई हे जागे झाले त्यांना पुढे मुलगा पाठोपाठ त्याची पत्नी व त्यांच्या पाठोपाठ मयताची बहीण पळताना दिसून आले.पुढे मुलाने थेट विहिरीत उडी मारली व त्याला वाचविण्यास गेलेली त्याची पत्नीने त्या पाठोपाठ विहिरीत उडी मारली व या दोघाना वाचविण्याच्या प्रयत्नांत मयताच्या बहिणीचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली.मात्र या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जागे होऊन तेही मदतीसाठी पळत आले त्यातील काहींनी ताबडतोब विहिरीत दोर सोडल्याने पडलेली मयताची बहीण वाचविण्यात त्यांना यश आले मात्र आधी विहिरीत उडी मारलेल्या पती-पत्नी यांना वाचविण्यास ते विहीर तळात गेल्याने विहिरीतील पाणी काढण्यास उशीर लागल्याने ते या दुर्घटनेत मयत झाले आहेत.

या बाबतची खबर मयताचे पिता तुकाराम कचरू खोतकर (वय-६०) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू र. नं.२४/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.

दरम्यान या घटनेत पतीपत्नीचे भांडण कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.त्यामुळे तर्ककुतर्काना उधाण आले आहे.पहाटे उशिरा पर्यंत या मयतांना विहिरीत दुसरे विद्युत पंप लावून पाणी काढण्यास उशीर झाला होता.आज पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास मयत पती-पत्नी यांना काढण्यास यश आले.त्यासाठी नजीकचे ग्रामस्थ व पोलिसानी यात मोठी कामगिरी केली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close