कोपरगाव तालुका
कोपरगावच्या नुकसानग्रस्त भागाची..यांनी केली पाहणी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी,ब्राम्हणगाव येथे शनिवारी सायंकाळी बेसुमार झालेल्या पावसामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी साहित्य भिजले होते.काही शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे.आ.आशुतोष काळे यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यासमवेत नुकतीच पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मळेगाव थंडी,ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ब्राम्हणगावमध्ये नागरिकांना पुन्हा अशा संकटाला सामोरे जावे लागले व नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी ग्रामसेवकाची कानउघाडणी केली.अशी संकटे वारंवार उदभवू नये यासाठी ग्रामसेवक,तलाठी यांनी प्रस्ताव तयार करावे.तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेवून पंचनामे पूर्ण करून अहवाल महसूल विभागाकडे पाठवावा-आ.काळे.
शनिवारी मळेगाव थडी,दवंगे वस्ती तसेच ब्राम्हणगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.रवंदा शिवाराकडून मळेगाव शिवाराकडे असलेला उतार व रवंदा-मळेगाव थडी रस्त्याचे कामामुळे काही ठिकाणी चर बुजले गेल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.याबाबत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना आ.काळे यांनी दिल्या. ब्राम्हणगाव येथे मागील अतिवृष्टीत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून त्याच ठिकाणी पुन्हा पाणी शिरले असून मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपासून कोणताही बोध न घेता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या उपाय योजना न केल्यामुळे पुन्हा नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते नाहीसे होतात हे रस्ते नकाशावर नाहीत त्यामुळे या रस्त्यांचा विकास होत नाही त्यासाठी हे रस्ते नकाशावर घेण्याच्या सूचना तहसीलदार योगेश चंद्रे यांना आ. काळे यांनी दिल्या आहेत.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल आसने,अरुण चंद्रे,प.सं. सदस्य श्रावण आसने,जिनिंग प्रेसिंगचे संचालक किसान आहेर,मळेगाव थडीचे सरपंच गोरख दवंगे,उपसरपंच विलासं दवंगे,दिलीप दवंगे,कोंडाजी खोंड,गोविंद दवंगे,अरुण दवंगे,तलाठी आर.पी. सोनवणे, तलाठी नानासाहेब जावळे,ग्रामसेवक बी.ओ.पाटील,ग्रामसेवक एफ.एम.तडवी आदी उपस्थित होते.