पर्यटन व तीर्थक्षेत्र
शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळयाचा सांगता समारंभ
जनशक्ती न्यूज सेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था तसेच नाट्य रसिक मंच,आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दिनांक ०४ ऑगस्ट सुरु झालेल्या श्री साईसच्चरित पारायण सोहळयानिमित्त आज सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत चालणा-या या पारायण सोहळयामध्ये आज सकाळी स्तवनमंजरीचे वाचन करण्यात आले.त्यानंतर अध्याय क्रमांक ५३ अवतरणिका वाचन होवुन ग्रंथ समाप्ती झाली. ग्रंथ समाप्तीनंतर श्री साईबाबा हॉस्पिटलचे कार्डीयोलॉजिस्ट डॉ.संदीप देवरे यांच्या हस्ते श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची पुजा व श्रींची आरती करण्यात आली आहे.
दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत चालणा-या या पारायण सोहळयामध्ये आज सकाळी स्तवनमंजरीचे वाचन करण्यात आले.त्यानंतर अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती झाली. ग्रंथ समाप्तीनंतर श्री साईबाबा हॉस्पिटलचे कार्डीयोलॉजिस्ट डॉ.संदीप देवरे यांच्या हस्ते श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची पुजा व श्रींची आरती करण्यात आली.
यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.उद्या दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० योवेळेत काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम होवुन श्री साईसच्चरित पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.याची साई भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.