जाहिरात-9423439946
सहकार

माध्यमिक शिक्षक बॅंकेचा व्याजदर कमी करणार-अध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माध्यमिक शिक्षक बँके मार्फत एका सभासदाला एकूण सतरा लाख रूपये कर्ज फक्त साडेआठ टक्के इतक्या कमी व्याजदराने त्वरीत मंजूर करत असून आपण भविष्यात कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करणार असल्याचे प्रतिपादन नूतन अध्यक्ष चांगदेव खेमनर यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.

बँके मार्फत एका सभासदाला एकूण सतरा लाख रूपये कर्ज फक्त साडेआठ टक्के इतक्या कमी व्याजदराने त्वरीत मंजूर करतो.तसेच आपण भविष्यात कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करणार आहोत तसेच मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांच्या जमा शेअर्स रकमा आपण वारसांना परत करतो-नूतन अध्यक्ष चांगदेव खेमनर.

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड जाहीर झाली असून नवनिर्वाचित अध्यक्षपदी चांगदेव खेमनर तर वाल्मिक बोठे यांची संचालक पदि निवड झाली आहे त्यांचा सत्कार कोपरगांव तालुक्यातील बँकेच्या सर्व शिक्षक सभासदांकडून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संचालक कैलास रहाणे,बाळासाहेब सोनवणे,अरूण पवार,म्हासाळ सर,मच्छिंद्र गाडेकर,भरत रुईकर,विजय देशमुख,भास्कर गुरसळ,गंगाधर केरे, गोकुळ जपे,दिपक बुधवंत,कान्हू गिरमकर,अशोकराव वारूळे,दिलीप तुपसैदर,विलास आवारी,अतुल कोताडे,दिलीप देवकर,कैलास सातपुते,वाल्मिक काकडे,शरद गागरे,नारायण डुकरे,मच्छिंद्र पाचोरे,राजेंद्र वानखडे,अनिल गवळी,संदिप जगझाप,चंद्रकांत शेजवळ,राजेंद्र देशमुख,महेंद्र खंडवे,भाऊसाहेब चंदनशिव इत्यादि सभासद उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगांव येथील सभासदांकडून आम्हाला खूपच सहकार्य लाभले आहेत त्यामुळेच कोपरगाव येथील सभासदांकडून मतदान जास्त झाले आहे.आपली संस्था पुरोगामी सहकार मंडळाचे जेष्ठ नेते संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथदर्शी व पारदर्शी पणे कार्यरत आहे. संस्थेचे एकूण ११ हजार ५०० सभासद असून आजपर्यंत एकूण ६१५ कोटि रूपयाच्या ऐच्छिक ठेवी आहेत तसेच ७१३ कोटी इतके कर्जवाटप करण्यात आले आहे.संस्थेचे मुख्य कार्यालय अहमदनगर येथे असुन एकूण बारा शाखा सभासदाच्या एका मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाकरीता संस्थेच्या पुरोगामी कन्यादान व भाग्यलक्ष्मी योजनेंतर्गत रूपये पंधरा हजार इतकी रक्कम विनापरतावा देण्यात येते तसेच देशसेवेचेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाल्यास आपल्या जिल्ह्य़ातील शहिद जवानाच्या कुटुंबियांना रूपये ५१ हजार इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणुन देण्यात येत असल्याची माहिती शेवटी दिली आहे.

यावेळी कोपरगांव येथील सभासद श्री गिरमकर सर यांनी मान्यवरांचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले.संचालक कैलास रहाणे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले आम्ही सर्व संचालक सभासदांना येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यास सदैव कटिबद्ध आहोत हि संस्था जिल्ह्य़ातील शिक्षकांची कामधेनू आहे.तिची जपणूक व जोपासना करणे हे काम संचालक व सभासद दोघांचेही आहे.
सत्कार समारंभ आटोपून अध्यक्ष व संचालक यानी कोपरगांव शाखेत भेट दिली त्यावेळी त्यावेळी कोपरगांव शाखेच्या वतीने शाखाधिकारी नितीन होन व सहकारी सागर सातपुते यांनी अध्यक्ष व संचालक यांचा सत्कार केला त्यानंतर त्यांनी शाखेतील दैनंदिन कामकाज व सभासदांच्या अडीअडचणी यांची माहिती शाखाधिकारी नितीन होन यांचेकडून जाणून घेतली घेतली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपक बुधवंत यांनी केले तर नारायण डुकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close