कोपरगाव तालुका
जिद्द आणि चिकाटीने यश सुकर-आ.आशुतोष काळे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सहजपणे यशोशिखरे गाठता येतात.जिद्द आणि कष्टाला मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी आपल्यातील आत्मविश्वासाच्या जोरावर आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न व तुमची महत्वाकांक्षा यांची योग्य सांगड घालून डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील जगातील शक्तिशाली भारत घडवा असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कंर्यक्रमात बोलताना केले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री साईबाबा तपोभूमी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
दहावी,बारावी नंतर पुढे काय हे प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांना देखील पडलेला प्रश्न असतो. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत.या संधीतून योग्य त्या क्षेत्राची निवड करून आदर्श नागरिक होवून कोपरगाव तालुक्याचे नाव उज्वल करावे-आ.काळे
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री साईबाबा तपोभूमी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन, काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जेष्ठ संचालक पद्माकांत कुदळे,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,अनिल कदम,जी.प.सदस्या सोनाली रोहमारे,सोनाली साबळे,नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,प्रशांत वाबळे,नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,सुनील शिलेदार,मेहमूद सय्यद,निखील डांगे,रोहित पटेल,चंद्रशेखर म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”दहावी,बारावी नंतर पुढे काय हे प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांना देखील पडलेला प्रश्न असतो. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत.या संधीतून योग्य त्या क्षेत्राची निवड करून आदर्श नागरिक होवून कोपरगाव तालुक्याचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी स्वराज्यनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना आ.काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.