जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

..या बंदमुळे करोना विषाणूची साथ थांबेल ? तज्ज्ञांचे उत्तर नकारार्थी ! 

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचं आवाहन केलं असून आज अनेक ठिकाणी लोकांकडून या आवाहनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. लोक दिवसभर आपल्या घरात थांबल्याने करोना विषाणूंचा फैलाव थांबेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

रविवारी अनेकजण घरात थांबले असून यामुळे लोकांचा विषाणूंच्या संपर्कात येण्यापासून बचाव होईल. तज्ञांनी हा एक चांगला प्रयत्न असून यामुळे लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा संदेश पोहोचत असल्याचं मत नोंदवलं आहे. मात्र यामुळे करोनाच्या विषाणूची साथ थांबेल असा दावा कारणं जरा जास्त धैर्याचं असेल असंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात असा कोणताच दावा केला नव्हता.

” एम्स” मधील मायक्रोबायोलॉजीच्या माजी प्रमुख डॉक्टर शोभा यांनी सांगितल्यानुसार, “फक्त एक दिवस लोकांमध्ये अजिबात संपर्क न आल्याने विषाणू नष्ट होती असं म्हणणं चुकीचं आहे. यामुळे विषाणूंचा फैलाव कमी करण्यात नक्की मदत होईल. पण यामुळे साखळी अजिबात तुटणार नाही. विषाणू २० ते २२ तासात नष्ट होतात असा कोणताही पुरावा नाही. मंत्रालयाने हा मुद्दा जरा जास्त फुगवून सांगितलेला दिसत आहे. जनता कर्फ्यूमुळे लोकांना सोशल डिन्स्टन्सिंगचं महत्त्व मात्र नक्की कळेल”.

कोणी केला होता दावा ?

आरोग्य विभागाचे सहसचिव अग्रवाल यांनी नरेंद्र मोदींच्या आवाहनला जनतेने प्रतिसाद दिल्यास करोना विषाणूचा फैलाव रोखला जाऊ शकतो असा दावा केला होता. “करोना विषाणूचा फैलाव कसा रोखावा हा नरेंद्र मोदींच्या भाषणातील दुसऱा महत्त्वाचा मुद्दा होता. जनता संचारबंदीच्या माध्यमातून आपण सोशल डिन्स्टन्सिंगचा प्रयत्न करु शकतो. हा एक दिवस आपल्याला विषाणू रोखण्यात मदत करु शकतो”. याशिवाय उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनीदेखील असाच दावा केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close