जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी दिल्या भेटी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या परिसरात राज्यस्तरीय ४६ वे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी, विविध जिल्ह्यातून नऊशे विद्यार्थी, शिक्षकांनी आपल्या उपकरणाच्या माध्यमातून सहभाग नोंदविला आहे. सर्व विज्ञानाच्या शाखांना स्पर्श करणारे हे विज्ञान प्रदर्शन सर्वांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील ३ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण तालुका कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे ४५ वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये नऊशे विद्यार्थी शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ३६५ उपकरणं तयार करून मांडले आहेत. पाच गटांमध्ये विज्ञान प्रदर्शनाच्या या उपकरणाची मांडणी करण्यात आली आहे. प्राथमिक विद्यार्थी व उच्च प्राथमिक विद्यार्थी गटात मध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी १२७ उपकरणे मांडले असून माध्यमिक व उच्चमाध्यमिक ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी १२७ उपकरणे मांडले आहेत. माध्यमिक शिक्षक गट, प्राथमिक शिक्षक गट, प्रयोगशाळा परिचारक, प्रयोगशाळा सहाय्यक यांचे स्वतंत्र गट तयार केले असून प्रत्येकी ३७ उपकरणे मांडण्यात आली असून या सर्वांचे एकत्रीत ३६५ उपकरणाची मांडणी प्रदर्शनांमध्ये करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये सामील झालेल्या ९०० सहभागी विद्यार्थी शिक्षकांची निवास- भोजनासह इतर व्यवस्था विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने करण्यात आली आहे. या विज्ञान प्रदर्शनात सर्व क्षेत्रातील आधुनिक उपकरणांची मांडणी करण्यात आली असून विद्यार्थी शिक्षकांसाठी भविष्यात अभ्यास करण्याकरिता अत्यंत उपयोगी प्रदर्शन आहे. तेव्हा परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील शाळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.हे विज्ञान प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत पहाण्यासाठी खुले होते. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. तब्बल तीस वर्षाच्या प्रयत्नानंतर अहमदनगर जिल्ह्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली आहे या प्रदर्शनामध्ये विज्ञान कथाकार संजय ढोले यांनी विज्ञानाच्या कथांचा कार्यक्रम सादर करून विज्ञान प्रेमींच्या ज्ञानात अधिकच भर टाकली आहे. विज्ञान, गणित ,कृषी, प्रदूषण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बॅटरीवर चालणारे उपकरणे यासह विविध उपकरणांची माहिती या प्रदर्शनात मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close