जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

प्रसाद खामकर यांची किसान काँग्रेस च्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड

जाहिरात-9423439946

पारनेर (प्रतिनिधी )-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. प्रसाद खामकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली .त्यांना 22 मार्च रोजी प्रदेश अध्यक्ष मा श्री संजय पाटील यांनी नुकतेच नियुक्ती पत्र दिले.
अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री राहुल गांधीचा दृष्टीकोन,त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट, शेतकरी ,शेत मजूर याबाबत काँग्रेसचे धोरण अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षाचे प्रभावी पणे काम करावे असे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे , प्रदेश अध्यक्ष आणि माझ्यावर टाकलेली यशस्वीपणे पार पाडनार असून पुढील काळात शासनाच्या विविध योजना खेडोपाडी राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचेही खामकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या निवडीचे राज्यातून वेगवेगळ्या भागातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close