खेळजगत
…या महाविद्यालयाचा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबई येथील सोमैया विद्याविहार येथे सोमैया ग्रुपच्या वतीने पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन टॉस-२०२२ क्रिकेट स्पर्धेत कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी झाला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी दिली आहे.या संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कर्णधार डॉ.सुनील कुटे यांना उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर,’मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला आहे.संघाचा ऑल राऊंडर खेळाडू रोहन यादव, उपकर्णधार डॉ.अभिजित नाईकवाडे,अष्टपैलू खेळाडू प्रा.सतिष पोखरकर,गोलंदाज विजय पाचोरे,किशोर गायकवाड यांचे उत्कृष्ट प्रदर्शन व प्रा.गौरव जपे,प्रा.आमिर शेख, प्रा.दिपक बुधवंत,शुभम पाचोरे,सुमित गरुड,गणेश पवार,रोहित लकारे यांचे क्षेत्ररक्षण विजयश्री मिळवून देण्यात मोलाचे ठरले आहे.
मुंबई येथील सोमैया ग्रुप,विद्याविहार यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक राज्यांतील सोमैया शिक्षण संकुलातील एकूण २४ संघांनी या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता.पाच षटकामध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम सामना कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय विरूद्ध बंगलोर येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि.,यांच्यामध्ये खेळला गेला.या सामन्यात महाविद्यालयाच्या संघाने गोदावरी बायोरिफायनरीज लि.,बैंगलोर संघाचा दणदणीत पराभव करून टॉस-२०२२ चषकावर आपले नाव कोरले आहे.आक्रमक फलंदाजी,अचुक गोलंदाजी,सुरेख क्षेत्ररक्षण व योग्य नियोजन या जोरावर महाविद्यालयाच्या संघाने सलग पाच सामने जिंकून हा चषक जिंकला आहे.कर्णधार डॉ.सुनील कुटे यांना उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर,’मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला आहे.संघाचा ऑल राऊंडर खेळाडू रोहन यादव, उपकर्णधार डॉ.अभिजित नाईकवाडे,अष्टपैलू खेळाडू प्रा.सतिष पोखरकर,गोलंदाज विजय पाचोरे,किशोर गायकवाड यांचे उत्कृष्ट प्रदर्शन व प्रा.गौरव जपे,प्रा.आमिर शेख, प्रा.दिपक बुधवंत,शुभम पाचोरे,सुमित गरुड,गणेश पवार,रोहित लकारे यांचे क्षेत्ररक्षण विजयश्री मिळवून देण्यात मोलाचे ठरले आहे.
महाविद्यालय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक प्रा.बी.आर.सोनवणे,व्यवस्थापक प्रा.सुजित पानगव्हाणे यांची भूमिका उल्लेखनीय होती.विजयी संघातील सर्व खेळाडूंना सोमैया ग्रुपकडून मेडल,मोमेन्टो,गिफ्ट हॅम््पर व संघाला ट्रॉफी,फिरता चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
टॉस २०२२ क्रिकेट स्पर्धेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सर्व खेळाडूंचा सत्कार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड. संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव यांच्या हस्ते करण्यात आला आहे.