जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर धाडी,दोन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अनेक वेळा टीकेचे धनी ठरलेले कोपरगाव शहर पोलीस ठाणे सक्रिय होताना दिसत असून त्यांनी कोपरगाव शहर आणि परिसरात अवैध व्यावसायिकांवर धाड सत्र सुरु केले असून आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत मनाई वस्ती येथे गावठी दारू पाडणाऱ्या अवैध व्यावसायिकांवर त्यांनी कडक कारवाई केली असून त्यात साहेबराव नाना सोनवणे व नानासाहेब कारभारी गायकवाड यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्र.

दरम्यान दुसऱ्या घटनेत याच नदी काठी दुसरा आरोपी नानासाहेब कारभारी गायकवाड यानेही मनाई वस्ती या ठीकाणी काट वनात आपला गोरख धंदा सुरु ठेवला होता.त्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे २५ हजार रुपये किमतीचा अवैध दारू निर्माण करण्याचा आंबट उग्रवास असलेला टिपाडात भरलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांची गत सप्ताहात मोठी भीती वाढली असताना निवारा परिसरात नुकत्याच तीन चोऱ्या आणि एक चोरीचा प्रयत्न उघड झालेला असताना नुकतीच किरण दत्तात्रय जाधव यांची सुमारे ५ लाखांची मारुती एर्टीगा व विश्वजित भास्कर कोकाटे यांची मारुती स्विफ्ट कार अशा दोन चार चाकी वाहनांच्या चोऱ्या उघड झाल्याने शहरातील वाहन धारकात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र आता विविध माध्यमांनी केलेल्या टिकेनंतर शहर पोलीस ठाणे सतर्क झाले असल्याचे दिसत असून त्यांनी आज सकाळ पासून धडक कारवाई सुरु केली आहे.त्यात आज सकाळी केलेल्या कारवाईत संवत्सर हद्दीत असलेल्या मनाई वस्ती काटवन येथे त्यांनी अवैध व्यावसायिक साहेबराव नाना सोनवणे (वय-४७) याने गोदावरी नदी पात्रालगत काट वनांत गावठी दारू बनविण्याचा उद्योग सुरु केला होता.त्याची खबर पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फ़त मिळाली होती.त्या नुसार टाकलेल्या धाडीत त्या ठिकाणी रुपये २५ हजार रुपयांचा गावठी हात भट्टीसाठी लागणारा कच्चा माल,आंबट रसायन,फायबरच्या टिपाडात सुमारे २ हजार ५०० लिटर इतके आढळुन आले आहे.घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत याच नदी काठी दुसरा आरोपी नानासाहेब कारभारी गायकवाड यानेही मनाई वस्ती या ठीकाणी काट वनात आपला गोरख धंदा सुरु ठेवला होता.त्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सुमारे २५ हजार रुपये किमतीचा अवैध दारू निर्माण करण्याचा आंबट उग्रवास असलेला टिपाडात भरलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.संभाजी शिंदे यांनी गुन्हा क्रं.अनुक्रमे ३९०,३८९/२०२२ महाराष्ट्र प्रोव्हीजन ऍक्ट ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close