खेळजगत
कोपरगावातील…या विदयालयांत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयच्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून विदयालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशात दरवर्षी २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्या मेजर ध्यानचंद यांचा या दिवशी जन्म झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते,ए.बीअमृतकर,ए.के.काले,डी.व्ही.विरकर,डी.पी.कुडके,एन.के.बडजाते,ए.जे.कोताडे,एस,डी.गोरे,आर.जे.चौधरी,बी.सी.उल्हारे,आर.आर.लकारे,एस.एन.शिरसाळे आदी शिक्षक व विदयार्थी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.उपमुख्याध्यापक रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.
मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर या वेळी म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाच्या आजारा नंतर क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा सुरु झाल्या असुन शासनाने शालेय स्पर्धा सुरु करणे आवश्यक आहे.कारण क्रीडा स्पर्धातुनच मुलांचा सर्वांगिण विकास होते.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे” असेही ते शेवटी म्हणाले आहे.
या कार्यक्रमांचे प्रास्तविक आर.बी.गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक एन.के.बडजाते यांनी तर आभार ए.के.काले यांनी मानले आहे.