जाहिरात-9423439946
खेळजगत

६५ व्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा उत्तर प्रदेश संघ मानकरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर नुकत्याच ६५ व्या १४ वर्षा खालील शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातील २८ संघांनी सहभाग घेतला होता. साखळी व बाद पध्दतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली. यात उत्तर प्रदेश, हरीयाना, उत्तराखंड व दिल्ली या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला असून अंतिम सामना दिल्ली व उत्तर प्रदेश या संघादरम्यान झाला यात उत्तर प्रदेश संघाने ७ गडयांनी दिल्ली संघाचा पराभव केला व सलग ७ व्या वर्षी या स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. दिल्ली द्वितीय व हरीयाना संघ तृतीय क्रमांकावर राहिले.

स्पर्धेचे पारीतोषिक वितरण रूषी अवस्थी (फिल्ड ऑफीसर),प्रदिप तिवारी (अस्स्टिंट फिल्ड ऑफीसर), शकील खान ( कनव्हेनर सी बी एस ई), मनित दिवाकर , स्पर्धा आयोजन सचिव सौरभ वेताळ इ. मान्यवरांच्या हस्ते झाले. सर्वात प्रथम वेताळ यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यरत असलेल्या सर्वांचे आभार मानले व सर्व संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा सत्कार केला. स्पर्धेतील सर्व सामनावीर, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज व मालिकावीर असे पुरस्कार देण्यात आले. तर तृतीय पुरस्कार, चषक व मेडल दिल्ली संघास रजत पदक व चषक तसेच उत्तर प्रदेश संघास सुवर्णपदक व चषक देउन गौरवण्यात आले.
स्पर्धा उत्कृष्ठरीत्या पार पाडल्याबददल स्पर्धा आयोजन सचिव सौरभ वेताळ यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close