कोपरगाव तालुका
…मार्च नंतर कोपरगावातील अतिक्रमण काढण्याचा पालिकेचा निर्णय !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम या मार्च महिन्यात अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या प्रमाणावर करावे लागणार असल्याने हा महिना संपल्यावर शहरात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय नुकताच संपन्न झालेल्या अंदाजपत्रकीय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील अतिक्रमण धारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची नुकतीच अंदाजपत्रकीय बैठक कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी हा विषय ऐरणीवर आणला आहे.त्यांनी कोपरगाव शहरातील अनधिकृत टपऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.रस्त्यावर नागरिकांना व वाहनांना चालणे मुश्किल बनले आहे.पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे अतिक्रमण काढण्यासाठी जातात त्यावेळी त्यांना शिवीगाळ केली जाते.त्यांची गचांडी पकडली जाते.त्यांच्या बापाचे गाव आहे का ? असा संतप्त सवाल करून अधिकारी व कर्मचारी यांची बाजू समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आढळून आला आहे.तसेच त्यांनी शहरात मटण मार्केट एकाच ठिकाणी घ्यावे.शहरात वेगवेगळ्या ठिकानीते पसरले असल्याने शहरातील नागरिकांत एखाद्या आजाराची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली आहे.व हे मटण मार्केट एकाच ठिकाणी घेऊन त्यांना सर्व सुविधा देण्याची मागणी केली आहे.त्याला अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला असून कोपरगाव बस स्थानकाच्या जवळ असलेले मटण मार्केट दहा वर्षांपासून बंद पडले आहे.गावात सर्वत्र मांसाहारी दुकानांचे अभद्र प्रदर्शन नको असल्याची टिपणी केली.तेथे सौचालय असूनही त्याचा वापर होत नसल्याने ते पाडून टाका.व त्या मार्केटचा विस्तार करा अशी मागणी केली. नाशिक महापालिकेने एकाच ठिकाणी मटण मार्केट केल्याची सभागृहास आठवण करून दिली.त्यावेळी अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी कहार गल्लीत यापूर्वी मटण मार्केट एकाच ठिकाणी होते मग ते का हलवले असा सवाल केला.व तेथे राजकारण आल्याने हटविण्यात आल्याचा आरोप केला.व शहर दोन ते अडीच कि.मी.वाढल्याने एका ठिकाणी मटण मार्केट करणे गैर होईल असा सल्ला दिला व हातगाडी वाल्या नागरिकांना दादागिरी करू नका.त्यांच्या बापाचे नाव काढू नका पालिका कर्मचाऱ्यांच्या काही चुका आहेत.ते १० रुपये पावतीचे पन्नास रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप केला.त्यावेळी अनेक नगरसेवकांनी त्याला हरकत घेतली कोण घेतो त्याचे नाव सांगा असा आग्रह धरला.त्यांनी मग काही हातगाडी वाल्याना पाचारण केले व सभागृहापुढे हजर केले.त्यावेळी अधिकाऱ्यांनी गावाबाहेरील व्यवसाय करणारे असतील तर त्यांच्याकडून जास्त पावती फाडण्यास परवानगी असल्याचा खुलासा केल्याने सय्यद याना या खुलशावर गप्प बसावे लागले.त्यावेळी या प्रश्नाला संदीप वर्पे यांनी विरोध करत एकाच ठिकाणी हे मटण मार्केट करणे हि नागरिकांची गैरसोय होईल.त्या ऐवजी शहरात चार ठिकाणी ते करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.मी स्वतःही मांसाहारी असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.त्यावेळी नगरसेविका सपना मोरे यांनी आधी खोका शॉप करा मग अतिक्रमणे व शहरातील अडथळे काढा अशी मागणी केली.मेहमूद सय्यद यांनी माशे विकणाऱ्यांची सोया करा त्यांना न्याय देण्याची मागणी केली.पालखी मार्गावरील अतिक्रमणावर बोलताना पालिकेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी गावातील या मुख्य रास्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याची आठवण करून देत मात्र काही पेपर मध्ये बातम्या येतात कि शहरात एवढे अतिक्रमण झाले अध्यक्ष वाहाडणे काय करतात ? संतापून त्यावेळी अध्यक्ष वाहाडणे म्हणाले कि,”माझे म्हणणे आहे,काढा अतिक्रमण काही जण शहरात अतिक्रमण करून शहरातील जागा बळकावत आहे.त्यासाठी त्यांनी साईबाबा कॉर्नवर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ संवरक्षक भिंतीजवळ अतिक्रमण कोणी केले आहे असा कडवा सवाल केला.तेथे ओळीने अतिक्रमणे कोणी केली ? त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ज्यावेळी हि मोहीम सुरु होईल त्यावेळी जो कोणी नगरसेवक आडवा येईल त्याच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करून आपल्या सहीने अहवाल पाठवू असा सज्जड दम भरला.संदीप वर्पे यांनी नगरपालिके जवळ असलेल्या मोकळ्या जागेचा उद्देश बदलून तेथे व्यापारी संकुल बांधण्याची सूचना केली.कर्मचारी वसाहत अन्यत्र हलवा, कर्मचाऱ्यांना येथेच जागा कशाला हवी.व्यापारी संकुळामुळे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे यांचे नाव निघते तसेच काम अध्यक्ष वहाडणे यांनी करावे असे आवाहन केले.व जास्त गाळे बांधल्याने मागणी आपोआप कमी होईल अध्यक्षांनी गाळ्यांचे काम तातडीने करावे.त्यावेळी वहाडणे यांनी गाळे धारकांकडे एक कोटी रुपयांची थकबाकी आहे.ती आधी कठोरपणे वसूल करा.थकबाकीदार कोण आहे याचा विचार करू नका.अनामत रक्कम भरूनही गाळे धारकांपुढे काही नागरिक अतिक्रमणे करून अडथळे आणतात त्याला प्रतिबंध करावाच लागेल असा इशारा दिला आहे.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याचे दायित्व नागरपालिकेवर नसल्याचा धक्कादायक खुलासा करून आतापर्यंत प्रत्येक निवडणूकित थापा मारणाऱ्या नेत्यांनाच तोंडघशी पाडले.