खेळजगत
राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत कन्या शाळेचे यश

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथे “१६ वी राष्ट्रीय सबज्युनिअर जम्परोप स्पर्धा” नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धेत संपुर्ण भारतातुन २२ राज्यातील ३५० खेळाडुनी सहभाग घेतला होता. या मध्ये कोपरगाव येथील डाँ.सी.एम.मेहता कन्या विद्यामांदिरच्या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
यात कु.संस्कृती सुभाष गाडे हिने “१४वर्षे वयोगट-३० सेकंद वेग रिले” या प्रकारात महाराष्ट्र संघास ब्रांझ पदक मिळवून दिले आहे. विदयालयाच्या सन्मानात प्रथमातच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.विदयालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे,उपमुख्याध्यापक नानासहेब नळे,पर्यवेक्षक मंगला राजेभोसले,अरुण गोर्हे,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य,पालक शिक्षक संघ व सर्व सहकारी वर्ग पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.विद्यालयाचे क्रीडाशिक्षक नितीन निकम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.