जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पाच नंबर साठवण तलावासाठी निधी द्या-आ.आशुतोष काळें

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सन २०१८-१९ दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावातील नागरिकांना अद्यापर्यंत दुष्काळी अनुदान मिळाले नसल्याचे लक्षात आणून देत कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाचवीला पुजलेल्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधून घेत पाच नंबर साठवण तलावासाठी निधी द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या उभ्या पिकात व नागरिकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना अडीच कोटीची नुकसान भरपाई मिळावी.२०१५/१६ मध्ये शेतकऱ्यांना रब्बीच्या आनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यावेळी तात्कालीन सरकारने रबी पिकविमा दिला आहे अनुदान दिले जाणार नाही असा खुलासा केल्यामुळे आजही शेतकरी रब्बी अनुदानापासून वंचित आहेत ते अनुदान मिळावे-आ. काळे

राज्य विधानसभेचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात बोलतांना आ.काळे म्हणाले की, राज्यात २०१८/१९ ला भीषण दुष्काळ पडला होता.त्यावेळी अवर्षणग्रस्त कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले होते. परंतु आपण केलेले विविध आंदोलन व जनतेच्या रेट्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ३४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र आजपर्यंत या गावातील नागरिकांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. या दुष्काळी अनुदानाचे १५ कोटी रुपये तातडीने मिळावे. कोपरगाव शहरातील नागरिकांना २०१६ मध्ये तब्बल २३ दिवसांनी,२०१९ ला १८ ते १९ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात आला होता व सद्यस्थितीत ९ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. कोपरगाव शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरासाठी पाणी साठा आरक्षित आहे. मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांसाठी पाणी टंचाई नित्याचीच झाली आहे. तसेच पाणी वितरण व्यवस्था जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. शहरातील नागरिकांना पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी व पाणी वितरण व्यवस्था नुतनीकरणासाठी निधी द्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून मतदार संघातील अनुत्तरीत व दुर्लक्षित प्रश्न मांडला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे पशुधन,लहान मुले व नागरिक बिबट्यांचे शिकार होत आहेत. हरीण व काळवीटांचे कळप शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान करीत आहे.बिबटे, हरीण काळवीट वर्गीकरण शेड्युल एक मध्ये येत असल्यामुळे वन विभाग कार्यवाही करीत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकरी व नागरिकांची मुक्तता करावी-आ. काळे

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आ. काळे म्हणाले की, २०१९ मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात महापुराने थैमान घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.कोपरगाव शहरात बांधण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्या इमारतीचा उपयोग चुकीच्या कामासाठी होत असून या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा अशा अनेक मागण्या आ. काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या पाचव्या दिवशी मांडल्या आहे आता शासन त्यावर काय भूमिका घेते या कडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close