नगर जिल्हा
संघाच्या अध्यक्षपदी सोनवणे तर सदिच्छाच्या अध्यक्षपदी गव्हाणे.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ यांची नुतन कार्यकारीणीची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून संघाच्या अध्यक्षपदी विनोद सोनवणे, तर सदिच्छा मंडळाच्या रामदास गव्हाणे यांची निवड झाली आहे.अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानी राज्य संपर्कप्रमुख विष्णु खांदवे हे होते.नूतन पदाधिकाऱ्यांचे कोपरगाव नगर जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या कार्यकारिणीची नुकतीच मुदत संपली होती.त्यामुळे नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पिंपळे होते.बाळकृष्ण कंठाळी,भास्कर कराळे,राजाभाऊ बेहळे व विनोद फलके आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव तालुका शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणें अध्यक्ष-विनोद सोनवणे,कार्याध्यक्ष-सुनिल सोळसे,सरचिटणीस-संतोष आखाडे, कोषाध्यक्ष-रविंद्र सुपेकर,कार्यालयीन चिटणीस-रतन वाघ,उपाध्यक्ष-योगेश मोरे,संघटक-राघु भांगरे संघटक-गणेश कहांडळ,संपर्कप्रमुख-सिताराम भांडकोळी आदींचा समावेश आहे.
सदिच्छा मंडळाची कार्यकारिणी पुढी प्रमाणे घोषित करण्यात आली मंडळाच्या अध्यक्षपदी-रामदास गव्हाणे,कार्याध्यक्ष-रमेश निकम, सरचिटणीस-पितांबर पाटील,कोषाध्यक्ष- आशिष पारडे,कार्यालयीन चिटणीस-प्रदीप साळवे,संघटक-राजु मेंगाळ,अमोल थेटे,उपाध्यक्ष-केशव जाधव,शाम डोळस,संपर्कप्रमुख-नितीन लोहार,बाबासाहेब लांडे, आदींचा समावेश आहे.
यावेळी उच्चाधिकार समितीची या प्रसंगी निवड करण्यात आली तिचे पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष-सुभाष पायमोडे,कार्याध्यक्ष-विलास भांड,सरचिटणीस-प्रभाकर कदम,समन्वयक,-जनार्दन भवरे,संघटक-बाबासाहेब काळे आदींचा समावेश आहे.
यावेळी पदविधर शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात अली असून अध्यक्षपदी-देवराम खेमनर,कार्याध्यक्ष-वाल्मिक गायकवाड,सरचिटणीस-राजाराम गोरे,कोषाध्यक्ष-रामभाऊ सोळसे,संघटक-आमोद माळी,आदी मान्यवारांचा समावेश आहे.
दरम्यान महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवडही या वेळी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी-कविताताई कुमावत,कार्याध्यक्ष-सुशिला राठोड,सरचिटणीस-पुनम मोरे,कोषाध्यक्षा-चंद्रकला डांगे,संपर्कप्रमुख-विजया जाधव,संघटक-सुनिता राऊत,विद्या मैड,रजनी आचारी,चंद्रकला जगताप आदींचा समावेश आहे.
कोपरगाव नगरपालिका शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवडही उपस्थित नेत्यांनी जाहीर केली असून अध्यक्षपदी-विलास माळी तर कार्याध्यक्ष-सनी गायकर,सरचिटणीसपदी-अर्जुन शिरसाठ,कोषाध्यक्षपदी-संतोष जाधव आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नगर परिषद सदिच्छा मंडळाच्या नियुक्त्या या वेळी उपस्थित जेष्ठ नेत्यांनी जाहीर केल्या असून त्यात अध्यक्षपदी-अरुण पगारे,कार्याध्यक्ष-गोपाळ कोळी सरचिटणीस-अमोल कडु,कोषाध्यक्ष-प्रतिभा केणे आदींचा समावेश आहे.
यावेळी नगर परिषदेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची केलेली निवड पुढील प्रमाणे अध्यक्ष-सविता साळूंके कार्याध्यक्ष-गितांजली चौधरी,सरचिटणीस-तेजस वारूळे,कोषाध्यक्ष-निर्मला बनसोडे,कार्यालयीन चिटणीस-विमल वाणी संपर्कप्रमुख-आरती कोरडकर,ऊपाध्यक्ष-सविता राहींंज आदींचा समावेश आहे.
सदर प्रसंगी जिल्हा प्रतिनिधी म्हणून चांगदेव ढेपले, सय्यद अब्दुल जब्बार,ज्ञानेश्वर वाकचौरे, सुनील रहाणे, माणिक कदम, कल्पना निम्बाळकर व ज्ञानेश्वर माळवे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नुतन पदाधिकाऱ्याचे तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.