जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कठीण परिश्रम घेणारे खेळाडूच यशस्वी होतात-आ. आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भोपाळ येथे पार पडणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीराच्या कालावधीत खेळाडूंनी दहा दिवस गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर मन लावून कठोर परिश्रम करून प्रशिक्षण घेतले असून कठीण परिश्रम घेणारे खेळाडूच नेहमी यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

आदिवासी विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल रेशीडेनशियल स्कूलमधील विद्यार्थांच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन भोपाळ येथे होणार आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १६ क्रीडा प्रकारातील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी प्रशिक्षणाची जबाबदारी आत्मा मलिक क्रीडा संकुलाकडे देण्यात आलेली होती.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नुकतेच गौतम पब्लिक स्कूल येथे प्रशिक्षण घेण्यात आले होते त्याचा समारोप नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलमधील हॉकी, फुटबॉल खेळाडूंना शुभेच्छा देतांना ते बोलत होते.
आदिवासी विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल रेशीडेनशियल स्कूलमधील विद्यार्थांच्या दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन भोपाळ येथे होणार आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १६ क्रीडा प्रकारातील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी प्रशिक्षणाची जबाबदारी आत्मा मलिक क्रीडा संकुलाकडे देण्यात आलेली होती. पूर्व तयारीसाठी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर जिल्हा बँकेच्या संचालिका तसेच कर्मवीर शंकरराव काळे एजूकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांच्या शुभहस्ते प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन करण्यात आले होते.

या प्रशिक्षनाच्या वेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,विश्वस्त वसंतराव आव्हाड, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने नूर शेख यांनी तर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सत्कार करण्यात आला.एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिबिरासाठी १० दिवस गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, क्रीडा संचालक सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, कपिल वाघ, संजय इटकर यांनी बहुमोल सहकार्य केले.गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर मिळालेले प्रशिक्षण, सहकार्य, मार्गदर्शन याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close