जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वतंत्र भारतात स्मशानभूमी साठी आंदोलन हि शोकांतिका-ढवळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्ष झाली मात्र आज स्वतंत्र भारतात आजही आदिवासीनां स्मशान भूमीसाठी आंदोलन करावे लागणे हि या आदिवासी जनतेसाठी शोकांतिका असल्याचे प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष तथा एकलव्य आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला होता तसेच त्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती.जनहितार्थ कामामुळे तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरश: लोकनायक बनला होता.

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर नुकतीच एकलव्य आदिवासी समाज संघटनेच्या वतीने थोर क्रांतिकारक तंट्या भिल्ल तथा तात्यासाहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,शिवसेनेचे उत्तर उपजिल्हा जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पवन सोनवणे,आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहिदास साबळे,अड्,रंजन वाघ,सुवर्णताई ढवळे, प्रदेश सचिव प्रा.किरण ठाकरे,जिल्हाध्यक्ष गोरख नाईक,नगरसेवक राजेंद्र गायकवाड,रंगनाथ सोनवणे,अशोक माळी, रतन सोनवणे,वैभव सोनवणे,गीताराम बर्डे,अनिल मोरे,दीपक ठाकरे,नाना बर्डे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,आमच्या महापुरुषांनी आमच्या भावी पिढ्यानीं सुरक्षितपणे पुढील वाटचाल कराव्या यासाठी परकीय सत्तेपुढे लढा दिला.यावेळी त्यांनी आदिवासी समाजातील तरुणांनी आपले उच्च ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील वीस गावातील सुमारे 958 शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून दिले.उर्वरित मुलांना आपण जानेवारी पर्यंत जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी प्रमोद लबडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तत्पूर्वी साईबाबा कॉर्नर पासून डॉ.आंबेडकर मैदानापर्यंत तंट्या भिल्ल तथा तात्यासाहेब यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोरख नाईक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close