जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आधुनिक शेतीसाठी माती परीक्षण आवश्यकच- डॉ.दत्तात्रय वने

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

आधुनिक शेतीसाठी जमिनीच्या स्वास्थ्याविषयक समस्यांचे निदान व त्यावरील उपाययोजना याबाबतचे नियोजन हे या माती व पाणी परिक्षणावरच आधरित असते. जमिनीच्या नियोजनासाठी माती परिक्षणाबरोबर, मृद सर्वेक्षणामुळे जमिनीची उत्पत्ती, तिचे गुणधर्म काय आहे हे समजत असून मृद सर्वेक्षणामुळे जमिनीच्या समस्या त्यातील घटक यांचे प्रमाण याची माहिती मिळत असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण पुरस्कार विजेते डॉ.दत्तात्रय वने यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

जमिन ही राष्ट्राची महत्वाची संपत्ती आहे या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गरजा जमिनीच्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. वनस्पतींची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पन्न करण्यासाठी मातीचा पर्यायाने जमिनीचा फारच उपयोग होतो- डॉ.दत्तात्रय वने

जागतिक मृदा दिनानिमित्त व मृदा आरोग्य पत्रिका पथदर्शी प्रकल्पांतर्गत कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कोपरगाव नजीक टाकळी फाट्यानजीक कृषी विभागाच्या बिजगुणन केंद्राच्या सभागृहात शेतकरी मेळावा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी, “शाश्वत शेती कार्यक्रमांतर्गत पिकांचे जलव्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य संवर्धन”या विषयावर ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुका पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव, कृषि विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

आज सकाळी संपन्न झालेल्या जागतिक मृदा आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात येसगाव येथील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रीकांचे वितरण पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम यांचे हस्ते वितरण करण्यात आले.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,सुपिक जमिन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेव आहे. पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीची पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये पुरविण्याची क्षमता चांगली असावी लागते. सुपिक जमिनीत जीवाणूमध्ये ऊर्जाशक्ती निर्माण होते. उष्णता व प्रकाश यांचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. हीच उर्जा जमिनीला परत मिळून जीवांची उपजीविका होते. जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. जमिनीची सुपिकता तिचे महत्व, आणि ती वाढविणे किंवा टिकविणे याबाबतच्या उपाययोजना करणे खूप महत्वाचे आहे.जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिन उत्पादनक्षम बनते. पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी मातीच्या परीक्षणावर आधरित खतांचा संतुलित वापर करणे फायद्याचे आहे. जमिन ही राष्ट्राची महत्वाची संपत्ती आहे या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गरजा जमिनीच्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. वनस्पतींची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पन्न करण्यासाठी मातीचा पर्यायाने जमिनीचा फारच उपयोग होतो.या खेरीज शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणणे हि प्रत्येक शेतकऱ्यांची गरज बनली असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शनसभापती अनुसया होन यांनी केले उपस्थितांचे आभार पंचाय समितीचे उपसभापती अनिल कदम यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close