कोपरगाव तालुका
आदिवासीसाठी शिधा पत्रिका,आधार कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाने दि.१८ ऑगष्ट रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे नगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र,शिधापत्रिका,आधार कार्ड नसलेल्या कुटुंबांना,लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहीम दि.१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.या योजनेचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी महादेव कोळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी प्रत्रकान्वये नुकतेच केले आहे.
“आदिवासी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जातीचा व वैधता दाखल्याची आवश्यकता असते.परंतु हे आदिवासी अडाणी व अज्ञानी आहेत.मोलमजुरी करतात.९८%आदिवासी जमाती कडे जातीचे व वैधता दाखले नाहीत. त्यामुळे आदिवासींची मुले,शिष्यवृत्ती,नोकरी व इतर शासकीय आदिवासी सवलती पासून वंचित राहात आहेत.जातीचा दाखला नसल्यामुळे ते नैसर्गिक रित्या खुल्या वर्गात फेकले गेले त्यांना योजनेचा लाभ होऊ शकेल”-अमित आगलावे,जिल्हाध्यक्ष,आदिवासी महादेव कोळी युवक संघ.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमातीतील अनुक्रमांक २८,२९ व ३० वर असलेल्या कोळी महादेव,ढोर कोळी,टोकरे कोळी,डोंगर कोळी,कोळी मल्हार,तसेच भिल,कोकणा,कातकरी,ठाकूर,पारधी,तडवी,वळवी, गावित,मावची,पाडवी अशा ४७ जमाती आदिवासी साठी म्हणजेच अनुसूचित जमाती साठी पात्र आहेत.आदिवासी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जातीचा व वैधता दाखल्याची आवश्यकता असते.परंतु हे आदिवासी अडाणी व अज्ञानी आहेत.मोलमजुरी करतात.९८%आदिवासी जमाती कडे जातीचे व वैधता दाखले नाहीत. त्यामुळे आदिवासींची मुले,शिष्यवृत्ती,नोकरी व इतर शासकीय आदिवासी सवलती पासून वंचित राहात आहेत.जातीचा दाखला नसल्यामुळे ते नैसर्गिक रित्या खुल्या वर्गात फेकले गेले.त्यामुळे त्यांना आदिवासी असल्याचा कोणताच लाभ मिळाला नाही.जे आर्थिक दृष्ट्या गरीब होते ते अधिक गरीब होत गेले.म्हणून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात सध्याची परिस्थिती विचारात घेऊन व शिधापत्रिका नसलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासन पूरक पत्र दि.१० जून २०२० अन्वये मान्यता देण्यात आली.तसेच ११ नोव्हेंबर २०२० अन्वये अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे,नाव कमी करणे,नावात बदल करणे,शिधापत्रिका विभक्त करणे यासाठी भरावयाचे शुल्क हे प्रकल्प अधिकारी यांनी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून अदा करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या संधीचा सर्व आदिवासीनी लाभ घेणे गरजेचे आहे.
जातीचा दाखला काढण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज,प्रतिज्ञापत्र,शिधापत्रिका,आधार कार्ड,प्राथमिक,माध्यमिक शाळेचा दाखला,सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक यांच्याकडील वास्तव्याचा दाखला,अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना यांनी वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवावेत असे आवाहन आदिवासी महादेव कोळी युवक संघ शाखा अहमदनगर,जिल्हाध्यक्ष अमित आगलावे,उपाध्यक्ष दिलीप सोनवणे,कार्याध्यक्ष,सुधीर दरेकर,सेक्रेटरी राजेश हजारे, खजिनदार नंदकुमार लांडगे आदींनी केले आहे.