कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळीची 1.15 कोटींची देयके वाटप !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी सुखासुखी जावी यासाठी मोठी पूर्व तयारी करून कोपरगाव नगरपरिषदेने राज्यात सर्वप्रथम त्यांची 1 कोटी 14 लाख 81 हजार 408 रुपयांची देयके प्रदान केल्याने कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे यांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी विश्वास गोर्डे यांचे आभार मानले आहेत.
चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवशी पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या ,आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना मानला जातो.या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो.काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवशी पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या ,आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.
या उत्सवास भारतात सर्वाधिक महत्व दिले जात असल्याने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था,खाजगी संस्था,सरकार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी काही ना काही आर्थिक तरतूद करून कर्मचाऱ्यांना खुश करत असते.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.कोपरगाव पालिकेने निवडणुकी आधीच कामाला लागून स्वच्छता व आरोग्य विभाग,बांधकाम विभाग व तत्सम विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाच्या फरकाच्या रकमा,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती रक्कम आदींची तरतूद करुण त्याना दिवाळीच्या आठवडाभर आधीच कर्मचाऱ्यांना खुश केले आहे.
या उत्सवास भारतात सर्वाधिक महत्व दिले जात असल्याने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था,खाजगी संस्था,सरकार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी काही ना काही आर्थिक तरतूद करून कर्मचाऱ्यांना खुश करत असते.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.कोपरगाव पालिकेने निवडणुकी आधीच कामाला लागून स्वच्छता व आरोग्य विभाग,बांधकाम विभाग व तत्सम विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाच्या फरकाच्या रकमा,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती रक्कम आदींची तरतूद करुण त्याना दिवाळीच्या आठवडाभर आधीच कर्मचाऱ्यांना खुश केले आहे. आरोग्य व स्वच्छता विभागाचे लक्षवेधी काम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलेले आहे.हि देयके वेळेवर देण्यासाठी लेखा विभाग प्रमुख तुषार नालकर, महारुद्र गालट, रामनाथ जाधव यांनी श्रम घेतले आहे.त्यामुळे पालिकेला हा बहुमान मिळाला आहे.
नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे,माजी अध्यक्ष सोपान शिंदे,पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष एम.के.पठाडे,माजी शहर अभियंता रवींद्र सोमासे,आदींनी अभिनंदन केले आहे.