खेळजगत
हॉकी व फुटबॉल मध्ये गौतमच्या संघाची राज्य व विभागीय पातळीवर निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
नगर येथील जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय स्तरावरील (१४ वर्षाखालील) शालेय हॉकी स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या असून या स्पर्धामध्ये गौतम पब्लिक स्कूलने आपले वर्चस्व राखले आहे.
विभागीय स्तरावरील शालेय हॉकी स्पर्धेत खेळताना गौतमच्या १४ वर्षाखालील हॉकी संघाने उपांत्य सामन्यात इंडियन मॉडेल स्कूल अक्कलकोट संघाचा ५-० ने पराभव केला आहे तर सेंट जोसेफ स्कूल पुणे संघाचा ५-० ने धुव्वा उडवत स्पर्धा जिंकली आहे. गौतमच्या स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील गौतमच्या फुटबॉल संघाने पाच सामन्यात अजिंक्य राहून उपांत्य सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलचा ३-० ने तर प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा १ -० ने पराभव केला आहे. गौतमचा हॉकी संघ पुणे विभागाचे राज्यपातळीवर तर फुटबॉलचा संघ विभागीय स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा कोल्हापूर येथे तर विभागीय फुटबॉल स्पर्धा सोलापूर येथे होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना राज्य क्रीडा मार्गदर्शक जऱ्हाड कुरेशी म्हणाले की, क्रीडाक्षेत्रात गौतम पब्लिक स्कूलचे योगदान मोठे असुन विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यास गौतम पब्लिक स्कूलमध्ये अनुकूल वातावरण आहे. शाळेत भव्य मैदाने खेळाडूंची राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा यामुळे राज्यभरातील खेळाडू गौतम पब्लिक स्कूलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात असे त्यांनी यावेळी नमुद केले.
गौतमच्या या दोन्ही विजयी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे व कपील वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सजंय ईटकर, रिजवान पठाण, कन्हैया गंगुले, हाउस मास्टर्स प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे, सुभाष वाणी आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे पंच म्हणुन अकबर खान, अमन शेख, जाकिरयार खान, राहुल लिंगायत आदी काम पाहीले. सदर स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजीं आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, संस्थेच्या सचिव चैताली काळे, संस्थेचे सर्व सदस्य व शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.