जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लोकप्रतिनिधी निष्क्रिय,मला निवडून द्या मी तालुक्याचे प्रश्न सोडवतो आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते व आरोग्याचे प्रश्न आजही प्रलंबित ते सोडवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला साथ द्या आपण ते आगामी काळात नक्कीच मार्गी लावू असे आवाहन कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने आशुतोष काळे यांच्या समाजकार्यावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेची सोडत नुकतीच संपन्न झाली त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे तसेच कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, अजीज शेख, तसेच सुनील शिलेदार, हिरामण कहार, रमेश गवळी, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, कृष्णा आढाव, रावसाहेब साठे, वाल्मिक लाहिरे, बाला गंगुले, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, विकास बेंद्रे, राजेंद्र आभाळे, नितीन बनसोडे, इम्तियाज अत्तार, बाळू सोनटक्के, विजय चवंडके, रवी राऊत, राहुल देवळालीकर,डॉ. तुषार गलांडे, महेश उदावंत, विकी जोशी, दादा पोटे, हारून शेख, जावेद शेख, रसीद शेख, गोरख पंडोरे, गणेश लकारे, दिनकर खरे, सोमनाथ आढाव, सतीश शिंदे, मुकुंद इंगळे, संतोष शेलार, आनंद जगताप, अॅड. मनोज कडू, निखील डांगे, निलेश पाखरे, संदीप कपिले, फिरोज पठाण, चांदभाई पठाण आदी मान्यवरांसह कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगावच्या नागरिकांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून पाणी, रस्ते, आरोग्य आदी पायाभूत सेवा मिळाव्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, माजी आ. काळे यांच्याकडे विकासकामे करण्याची मानसिकता असल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतानांही त्यांनी कोपरगाव शहर व तालुक्यासाठी केलेली विकासकामे नागरिकांच्या समोर आहेत. कोपरगावच्या नागरिकांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी साठवण तलाव अपुरे पडत असल्यामुळे चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी २ कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु शहराच्या नागरिकांना पाणी मिळू नये अशी मानसिकता असलेल्या सत्ताधाऱ्यांमुळे हा निधी परत गेला. चार नंबर साठवण तलावाच्या बाबतीत जे घडलं तेच पाच नंबर साठवण तलावाच्या बाबतीत घडत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोपरगाव शहरवासियांच्या अपेक्षा अतिशय माफक आहेत. विकासाचे कामे करायला सत्ता किंवा पद गरजेचे नाही त्यासाठी विकासकामे करण्याची मानसिकता असावी लागते. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे विकासकामे करण्याची मानसिकता नसल्यामुळे तालुक्याचे व शहराचे प्रश्न जैसे थेच आहेत.

यावेळी प्रश्न मंजुषा स्पर्धेची नशीब सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या रुपये एक लाख रोख रक्कमेच्या भाग्यवान विजेत्या संजयनगर येथील मालनबाई मच्छिंद्र डोळस या ठरल्या. द्वितीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयाचे भाग्यवान बापू सोपान वाघमारे तर तृतीय क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे बक्षिस बालाजी आंगण या भागातील आदित्य सुरेश खेमनर हे ठरले आहे. सर्व भाग्यवान विजेत्यांना कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष यांचे हस्ते व, चैताली काळे तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीसे देण्यात आली.

या स्पर्धेमध्ये आशुतोष काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये कोपरगाव शहरातील एकूण २८,७५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २६,३१६ स्पर्धकांनी अचूक उत्तरे दिली होती. त्यामुळे एक लाख रुपयाच्या बक्षिसाचे मानकरी कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी तर सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.त्यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close