जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डाऊच जवळ अपघातात एक ठार,एक गंभीर जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तळेगाव मार्गे संगमनेर रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अंडरसुल येथील शेतकरी व दुचाकीस्वार रवींद्र सर्जेराव जानराव (वय-42) यांचे जागेवरच निधन झाले आहे तर त्यांचे सहकारी नवनाथ निवृत्ती बागुल (वय-38) हे गंभीर जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,अंदरसुल ता. येवला येथील शेतकरी रवींद्र जानराव व नवनाथ बागल हे दोघे शनिवार दिनांक 7 संप्टेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास नक्की वेळ माहित नाही आपल्या पाहुण्याकडे काही कामासाठी गेले होते ते घरी परतत असताना डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आले असता त्यांच्या दुचाकीला (क्रं.एम. एच.15 बी.एस.8380) अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन गाडीला धडक दिली त्यात रवींद्र जानराव हे जागीच ठार झाले आहे तर त्यांचे सहकारी नवनाथ बागल हे गंभीररित्या जखमी झाले आहे. सदर घटनेची खबर चांदेकसारे येथील कार्यकर्ते सुभाष होन यांनी मयताच्या नातेवाईकांना भ्रमनध्वनिवरून दिली व रुग्णवाहिका बोलावून नजीकच्या दवाखान्यात जखमी नवनाथ बागल याना भरती करण्यात आले या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.राकेश मांनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close