खेळजगत
तत्कालीन आ. कोल्हेनीं क्रीडा संकुल पळविले-मोदी मंचचा आरोप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सि. स.नं.१७६७,क्षेत्र २२०९२६ चौ.मी.जागा तालुका क्रिडा संकुलासाठी दि.१३ मार्च २००३ च्या आदेशानुसार तालुका क्रिडा संकुल समितीला विनामुल्य वर्ग करण्यात आली होती.पण तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या पदाचा व राज्यातील सत्तेचा गैरवापर करून कोपरगाव शहरात होणार असलेले हे क्रिडा संकुल शहरापासून तीन ते चार कि.मी. दुर अंतरावर असलेल्या “संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मालकीच्या जागेत पळवून नेले असल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडने यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.
कोपरगाव शहारातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचे क्रीडा संकुल मंजूर केले होते.त्यासाठी क्रिडा संकुलासाठी दिलेली जागा ही इनडोअर गेम हॉलच्या दक्षिणेस पुररेषेत येत असल्याचा बहाणा सदरचे क्रीडा संकुल खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत आपल्या खाजगी इंग्लिश मिडीयम स्कूल नजीक पळविण्यात येऊन तसे लेखी पत्रही आ. कोल्हे यांनी शासनाला दि. २३ जून २००३ व दि.२४ ऑगष्ट २००३ तसेच वेळोवेळी दिले.आ.कोल्हे यांची केलेली बनवाबनवी बघा पुररेषेचे कारण सांगून ज्या जागेत क्रिडा संकुल होऊ दिले नाही त्याच जागेवर मात्र कोल्हे यांच्याच नेतृत्वाखालील आपल्या चेल्यानी “जलतरण तलाव”बांधून कोट्यावधी रुपये मातीत व खिशात घातले.सत्ता नगरपरिषदेची असो कि कोणतीही सत्तेचा गैरवापर करून स्वार्थ साधने हाच कोल्हे घराण्याचा इतिहास राहिलेला आहे.
कोपरगाव शहरापासून दुर अंतरावर संजीवनीच्या साम्राज्यात क्रिडा संकुल नेल्याने गरीब,होतकरू सर्व स्तरातील महिला व पुरुष खेळाडूंवर मोठा अन्याय झालेला आहे.इतक्या दुर अंतरावर सर्वसामान्य गरीब खेळाडू सरावासाठी-खेळण्यासाठी जाऊच शकत नाहीत.
खरे तर त्यावेळचे जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांना दि.१७ जुलै २००३ ला भारतीय जनता पार्टीच्यावतीने आपण निवेदन देऊन संबंधित क्रीडासंकुल कोपरगावातच व्हावे अन्यथा कोपरगावातील क्रिडाप्रेमी नागरिक याबाबत आंदोलन करतील असा इशाराही दिला होता.पण मात्र आ. कोल्हे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी क्रीडासंकुल संजीवनीवर नेण्यात आले.जिल्हाधिकारी देवरा यांनी सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई यांना तसा लेखी अहवाल देऊनही आ. कोल्हे यांनी कोपरगावचे क्रीडासंकुल पळवून कोपरगाव शहरावर फार मोठा अन्याय करून,खेळाडूंचा तळतळाट घेतला आहे.केलेल्या या पापाची परतफेड करायची असेल तर कोल्हे परिवाराने कोपरगाव शहरात क्रीडासंकुल बांधून दिले पाहिजे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही सहकारातून लाटलेले कोट्यावधी रुपये उधळण्यापेक्षा तीच रक्कम विधायक कार्यासाठी वापरावी.कोपरगाव शहरात क्रीडासंकुल उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंनी खेळायचे कुठे ? सराव-व्यायाम कुठे करायचा ? खेळाडू कसे तयार होणार? या प्रश्नांशी कोल्हे यांना काहीच देणेघेणे नाही,हे जनतेच्या व होतकरू तरुणांच्या-खेळाडूंच्या लक्षात आलेले आहे.चाळीस वर्षे आमदारकी भोगून फक्त स्वार्थ साधणाऱ्या या प्रवृतींना पक्ष व पद फक्त स्वतःच्या परिवारासाठी हवे असल्याचा आरोपही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केला आहे.