जाहिरात-9423439946
खेळजगत

गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस सुरुवात   

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल,गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलमध्ये राज्यस्तरीय (१७ वर्ष मुली) सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०१९/२० चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाट्न कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले व गौतम पब्लिक स्कूलच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित खेळाडूंसह संचलन केले. या दिवशी आलेल्या संघाची प्रवेशिका जमा करणे. भाग्यपत्रिका टाकणे इत्यादी कामे करण्यात आली. दुस-या दिवशी स्पर्धेच्या प्रारंभीक सामन्यात मुंबई संघाने औरंगाबाद संघाचा २-० ने पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात नागपूर संघाने लातूर संघाचा ५-० गोल फरकाने पराभव केला याच दिवशी नागपुर विरुद्ध लातुर,क्रीडा प्रबोधिनी पुणे विरुद्ध अमरावती,कोल्हापुर विरुद्ध नासिक, पुणे विरुद्ध मुंबई असे एकुण पाच सामने रंगणार आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे,लातूर, नागपूर, नासिक, कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनी पुणे असे एकुण ९ संघ सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर रविवार दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत खेळाविल्या जाणार आहे. स्पर्धेतील विजयी संघ हा नवी दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय (१७ वर्ष मुली) सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे.या प्रसंगी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी, कविता निंबाळकर म्हणाल्या की, गौतम पब्लिक स्कूल मध्ये खेळासाठी व विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी पोषक वातावरण असुन भव्य क्रीडांगण, अनुभवी प्रशिक्षक,निवासाची व भोजनाची उत्कृष्ट सोय केली आहे. शाळेने उदघाटनाचा कार्यक्रम उत्तम दर्जाचा घेतल्याने आम्हाला राष्ट्रीय दर्जाच्या उद्घघाटनाची अनुभूती झाली असल्याचे गौरवदगार काढले. शाळेचे प्राचार्य नूर शॆख म्हणाले की, शाळेत प्रत्येक खेळाडूची योग्य ती काळजी घेतली जाईल. आवश्यक त्या सोयी पुरवल्या जातील त्याच बरोबर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अशॊक काळे,विश्वस्त आशुतोष काळे, सचिव चैताली काळे व व्यवस्थापक समितीचे स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आभार मानले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे व शाळेचे प्राचार्य नूर शॆख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा संचालक सुधाकर निलकए हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, संजय इटकर, कपिल वाघ,रिजवान पठाण इत्यादी परिश्रम घेत आहेत. निवृत्त फुटबॉल राज्य क्रीडा मार्गदर्श हरीहर मिश्रा, धिरज मिश्रा, फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक हे तांत्रिक भाग सांभाळत आहे. तसेच पंच म्हणुन शाम तायवडे, ईश्वर पवार,बलराम मुरादी, उमेर शेख, निसार अहमद,प्रसाद पाटोळे, ऋषाली पाटेकर, अक्षय नायडू, गणेश शिंदे इत्यादी काम पाहत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण व आभार सुधाकर निलक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close