जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

…या ठिकाणी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

   कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरातील चासनळी येथील मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत गाव आणि परिसरात ३१ वटवृक्षांची मोठ्या उत्साहात लागवड केली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
   

“केवळ परिसराची स्वच्छता ही जबाबदारी नव्हे, तर भविष्यासाठी हरित वारसा जपणे ही आजची गरज आहे.मायभूमी सामाजिक संस्थेमुळे गेल्या काही वर्षांत परिसरात खूप मोठा बदल जाणवत आहे.इथले तरुण सामाजिक भान राखून आदर्श घडवत आहे”-सोमनाथ चांदगुडे,माजी अध्यक्षभाजप,कोपरगाव तालुका.


जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी जगभर केला.हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि स्पष्ट करण्यासाठी आपण समोर मांडले आहे.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांद्वारे हा दिवस आयोजित केला आणि अनेक देश,संस्था आणि व्यक्ती सहभागी होतात.हा दिवस पर्यावरणाशी संबंधित समस्या आणि त्यांचे परिणाम लोकांमध्ये वाढवतो व जागृती करतो. या शिवाय लोकांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काय हवे,हे शिकवतो.हा दिवस सरकार व्यवसाय समुदाय आणि व्यक्ती एकत्र आणतो आणि पर्यावरणासाठी,कार्य करण्यास प्रोत्साहित करतो.या दिवसाचे निमित्ताने धामोरी आणि चासनळी आदी ठिकाणी मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्ष लागवड करणेत आली आहे.यावेळी फाउंडेशनतर्फे या ३१ वटवृक्षांच्या संवर्धनाचीही जबाबदारी उचलण्यात आली आहे.लागवड करण्यात आलेल्या सर्व वटवृक्षांना कुंपण जाळ्यांची सोय करण्यात आली असून,ग्रामस्थांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले आहे.काही सहकारी संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली आहे. सदर कार्यक्रमात मायभूमी फाउंडेशनचे सर्व सदस्य,गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close