जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणाहून पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर ( वार्ताहर)

   श्रीक्षेत्र धामोरी येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या श्री अडबंगीनाथ पायी दिंडी वारीचे अहिल्यानगर येथील विळद घाटातील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.

  

संत नारायण महाराज देहूकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून घेऊन पुढे आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन अनेक दिंड्या सह पालखी सोहळा या संकल्पनेतून देहू आळंदी पंढरपूर अशी आषाढी वारीची परंपरा चालू केली.यात सर्वात आधी संत तुकारामाची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातुन निघते त्यानंतर राज्यातून कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र धामोरीसह विविध ठिकाणाहून प्रस्थान होते.

   संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव पालखी सोहळा जनक तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून घेऊन पुढे आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन अनेक दिंड्या सह पालखी सोहळा या संकल्पनेतून देहू आळंदी पंढरपूर अशी आषाढी वारीची परंपरा चालू केली.यात सर्वात आधी संत तुकारामाची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातुन निघते त्यानंतर राज्यातून विविध ठिकाणाहून दींड्या निघतात.कोपरगाव तालुक्यातील क्षेत्र धामोरी येथील दिंडीचे नुकतेच प्रस्थान झाले आहे.

   श्री क्षेत्र द हमोरी येथील श्री अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा दिनांक १८ जून २०२५ पासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर या ठिकाणी पाई वारीसाठी निघालेला असून या दिंडीमध्ये ३०० च्या वर वारकरी नाशिक,अहिल्यानगर  व संभाजीनगर जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत.

   कोपरगाव तालुक्यातील धामोरी,संवत्सर,भोजडे,कान्हेगाव व इतर अनेक गावांमधून या  दिंडीमध्ये वारकरी सहभागी असून या दिंडीसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने डॉ.अभिजीत दिवटे यांनी दिंडीचे स्वागत करून भाविकांना चहा,नाष्टा व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून  सहकार्य केले व दिंडीस शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दिंडीचालक हरिभक्त पारायण पांडूबाबा भाकरे तसेच हरिभक्त परायण मधुकर महाराज गडाख,श्री म्हसे,अशोक वावधने,बाळासाहेब दहे,दिलीपराव ढेपले,लक्ष्मणराव साबळे यांनी डॉक्टर अभिजीत दिवटे यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close