गुन्हे विषयक
हॉर्वेस्टरचा धक्का लागल्याने मारहाण,कोपरगावात सहा जणांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी शिवारातील रस्त्यावरून हॉर्वेस्टर जात असताना त्याचा ट्रॅक्टरच्या औजाराला धक्का लागून ते खाली पडल्याचे कारणावरून फिर्यादिस मारहाण केल्या प्रकरणी आरोपी आप्पासाहेब कारभारी जावळे यांचेसह सहा जणांवर फिर्यादी सविता रामदास जावळे (वय-४५) यांनी गुन्हा दाखल केल्याने सोनेवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेच्या घराशेजारी एक रस्ता असून गहू काढण्याचा हंगाम सुरु असल्याने त्यावरून एक हॉर्वेस्टर जात असताना त्याचा धक्का फिर्यादीचे ट्रॅक्टरच्या औजाराला लागला होता.त्यामुळे सदर औजार हे खाली पडले होते.त्यावरून फिर्यादी महिला त्याचा आरोपींना जाब विचारण्यास गेली असता त्याचा राग येऊन आरोपी आप्पासाहेब कारभारी जावळेसह सहा जणांनी मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला सविता जावळे या सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहेत.त्यांच्या घराशेजारी एक रस्ता असून गहू काढण्याचा हंगाम सुरु असल्याने त्यावरून एक हॉर्वेस्टर जात असताना त्याचा धक्का फिर्यादीचे ट्रॅक्टरच्या औजाराला लागला होता.त्यामुळे सदर औजार हे खाली पडले होते.त्यावरून फिर्यादी महिला त्याचा आरोपींना जाब विचारण्यास गेली असता त्याचा राग येऊन आरोपी आप्पासाहेब कारभारी जावळे,माधुरी शांतीलाल होन,शांतीलाल व्यंकट होन,विनायक आप्पासाहेब जावळे,सरिता (पूर्ण नाव माहीती नाही ) सरिताचा नवरा (पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा.सोनेवाडी आदींनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी महिला सविता जावळे व त्यांचा पती रामदास मलु जावळे,त्याचा मुलगा गौरव आदींना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व गजाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यात फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली असून त्या वैद्यकीय उपचार घेत आहेत.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१६४/२०२३ भा.द.वि. कायदा कलम-१४३,१४७,१४८,३२४,३२३,५०४,५०६ अन्वये नुकताच नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करीत आहेत.