जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

दहा कोटींच्या रस्त्याची आठवड्यात लागली वाट,चौकशीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्यावर गत महिन्यात जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च करून सदर रस्ता तयार करण्यात आला असताना हा रस्ता अवघ्या काही आठवड्यात पुन्हा,’जैसे थे’ झाला आहे.त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता किती निकृष्ट आहे हे उघड झाल्याने जवळके,बहादरपूर,वेस-सोयगाव,रांजणगाव देशमुख,तळेगाव दिघे आणि परिसरातील नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.व या रस्त्याची व त्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जवळके आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कोपरगाव नगर परिषद हद्दीत तर सत्ताधारी आणि विरोधी आघाडी यांनी अलिखित करार केला असून यात सत्ताधारी गटास ६० टक्के तर विरोधी नेत्याच्या पित्यांना ४० टक्के कामे वाटून घेण्याचे ठरले असल्याच्या खात्रीलायक बातम्या हाती आल्या आहेत.त्यामुळे कोपरगाव,संगमनेर,राहाता आदी तालुक्यात मुख्यमंत्री व विविध नेत्यांचे लाडके लोकप्रतिनिधींचा दर्जा किती खालावला आहे हे उघड झाले आहे.

आशियायी विकास बँकेने या रस्त्यासाठी राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या ३० कि.मी.रस्त्यासाठी सुमारे १८९ कोटी रुपयांचा निधी सन-२०१८ साली प्रस्तावित केला होता.सदर मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल,प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता आदीं कामांचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.त्यामुळे गर्दीच्या ठीकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती.मात्र त्याची तीस टक्के निधीची राज्य सरकारची निधीची तयारी असल्याचे दिसले नाही व त्यासाठी स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला नाही.त्यामुळे सदरचा निधी हे दिवास्वप्न ठरले होते.मात्र त्या ऐवजी झगडेफाटा ते जवळके हद्दीसाठी तात्पुरती डागडुजी करण्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता तर उर्वरित जवळके ते संगमनेर हद्द भागवतवाडी पर्यंत पाच कोटींचा निधी मंजूर झाला होंता.त्यातील पहिल्या टप्प्याचे १० कि.मी.चे काम लगेच काम सुरु केले होते.सदरचे काम होऊन काही आठवडे उलटत नाही तोच एका पावसात सदरचा रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे.पोहेगाव हद्दीत वक्रतुंड मंगल कार्यालयासमोर तो पूर्ण उखडला आहे.तर हीच स्थिती माजी आ.स्व.के.बी.रोहमारे वस्तीजवळ,गोदावरी कालवा परिसर,शहापूर,बहादराबाद,जवळके आदी ठिकाणी उध्वस्त झाला आहे.त्यामुळे सदरचे काम करणारा ठेकेदार कोण आहे.व त्यावर कोणत्या अधिकाऱ्याने देखरेख केली हे समजणे गरजेचे बनले आहे.कोपरगाव तालुक्यातील अन्य रस्त्यांची स्थिती वेगळी नाही.त्यामुळे निधी येतो पण तो रस्ते दुरुस्तीसाठी येऊन जनतेचे प्राण वाचविण्यासाठी येतो की,जिल्ह्यातील वा तालुक्यातील राजकीय आश्रित नेत्यांचे ठेकेदार,दलाल यांचे पोट भरण्यासाठी येतो असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कोपरगाव नगर परिषद हद्दीत तर सत्ताधारी आणि विरोधी आघाडी यांनी अलिखित करार केला असून यात सत्ताधारी गटास ६० टक्के तर विरोधी नेत्याच्या पित्यांना ४० टक्के कामे वाटून घेण्याचे ठरले असल्याच्या खात्रीलायक बातम्या हाती आल्या आहेत.त्यामुळे कोपरगाव,संगमनेर,राहाता आदी तालुक्यात मुख्यमंत्री व विविध नेत्यांचे लाडके लोकप्रतिनिधींचा दर्जा किती खालावला आहे हे उघड झाले आहे.

हा रस्ता होण्याच्या आधी पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत गणेश मंदिराजवळ व पोहेगाव येथील माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांची वस्ती,बहादराबाद,शहापूर,जवळके,धोंडेवाडी,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी अवजड वहाने अपघात ग्रस्त होऊन अनेकांना आपले जीवित व वित्तीय हानी सोसावी लागली आहे.दैनंदिन वापरासाठी या नजीकची खेडी या रस्त्यामुळे बेजार झाली होती.त्याना आपला शेतीमाल अन्यत्र नेणे हि मोठी शिक्षा ठरत होती.मात्र ‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीनुसार दहा कोटी रुपयांची तरतूद होऊन सदरचा रस्ता सुरु करण्यात आला होता.त्यामुळे ग्रामस्थानीं मोठे समाधान व्यक्त केले होते.

दरम्यान या रस्त्याचे काम होऊन अवघे काही आठवडे उलटत नाही तोच पुन्हा एकदा या रस्त्यालगतच्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा,’बळी जाणे’ हि बाब ‘आपल्या भाळी’ लिहिली गेली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांत मोठा असंतोष खदखदत आहे.त्यामुळे या प्रकरणी संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्पे यांनी यात लक्ष घालून याची चौकशी करावी व ठेकेदार यांचे बिल देऊ नये अशी मागणी या परिसरातील कार्यकर्ते गंगाधर रहाणे,सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,सुभाष रहाणे,बाळासाहेब चि.रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,डी.के.थोरात,बंडोपंत थोरात,माजी उपसरपंच रमेश दिघे,मच्छीन्द्र दिघे,संजय गुंजाळ,विजय थोरात,गोरक्षनाथ शिंदे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,नरहरी पाचोरे,गणपत पाचोरे,शिवाजी रोहमारे,सचिन औताडे,बंडू देशमुख,ग्रामस्थानीं केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close