विविध पक्ष आणि संघटना
ऊसाला किमान ०५ हजार ५०० रुपयांचा दर जाहीर करा,मगच कोयता चालवा-…मागणी

न्यूजसेवा
संवत्सर- (शिवाजी गायकवाड)
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येणाऱ्या साखर कारखान्याच्या नेत्यांनी त्यांचे उपपदार्थ धरून ०७ हजार ५०० रुपयांचा प्रतिटन भाव द्यायला हवा पण ते देणार नाही.मात्र त्यांनी किमान ऊसाला प्रतिटन ०५ हजार ५०० रुपयांचा दर जाहीर करावा मगच ऊस तोडीसाठी कोयता चालवावा अशी प्रमुख मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी नुकतीच नाटेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

“शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी नानासाहेब मोरे,खंडू मोरे यांच्या सहकार्याने कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संघटित करून पहिली शाखा सुरू केली त्याबाबत त्यांचे कौतुक करून त्यांनी निळवंडे कालव्यांचा प्रदीर्घ लढा लढल्यानंतर शिर्डी विमानतळ,राज्यातील पोल्ट्रीधारकाचा लढा,येसगाव पाट येथील अवैध व्यवसायांचे निर्मूलन आदी लढे यशस्वी करून दाखवले असल्याचे कौतुक केले आहे.कागदपत्रे नसतील तर कोणताही लढा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात लढता येत नाही.ते काम नानासाहेब जाणारे आणि त्याचे सहकारी चोख बजावत असल्याचे त्यांनी सांगून आगामी काळात नाशिक जिल्ह्यातील येवला आणि कोपरगाव येथील दूषित भूजलाचा प्रश्न निकाली निघेल”-ॲड.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखानदारी सर्वात शेतकऱ्यांचे खिसे कापून आधी उभारली अशी टिमकी वाजवली जाते आहे.मात्र शेतकऱ्यांना फसवण्याचे उद्योगही त्याच भागातून सुरू झाले असून आता शेतकऱ्यांना सर्वात आधी जागृत होण्याची गरज निर्माण झाली असून ही लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शेतकरी संघटनेने कोपरगाव तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या हस्ते व राज्याचे प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले हे होते.

“शेतकरी संघटनेने गेली अडीच वर्षापूर्वी पश्चिम सह्याद्रीच्या घाटमाथ्याचे पश्चिम समुद्राला वाहून जाणारे 115 टी.एम.सी.पाणी उर्ध्व गोदावरी नदीत पाणी वळविण्यासाठी नानासाहेब जवरे,रुपंद्रे काले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ॲड.अजित काळे यांचे विधी सहाय्याने जनहित याचिका दाखल करून पाणी वळविण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे नगर-नाशिक वाद संपणार असून मराठवाड्याला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.त्यामुळेच आता राज्यातील आणि या भागातील मंत्री,नेतेमंडळी यावर नाईलाजाने पिपाण्या वाजवत फिरताना दिसुन येत आहे”-साहेबराव चोरमल,ज्येष्ठ कार्यकर्ते,शेतकरी संघटना.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,शेतकरी संघटनेचे डॉ.आदिक,साहेबराव चोरमल,सतिष नाईक,शिवाजी गायकवाड,व्यंकट धट,नाटेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश मोरे,माजी सरपंच विक्रम मोरे,नांदेसर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष जाधव,पिंपळगाव जलाल ग्रामपंचायत सरपंच प्रवीण देशमुख,बदापूरचे सरपंच अण्णासाहेब मोरे,ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब गायकवाड,खंडेराव मोरे,केमिकल इंजिनियर जयकुमार जाधव,सुरेश बोरजे,राजेंद्र वाणी आदीसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यातील साखर कारखानदारांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि त्यामुळे निर्माण झालेली गंभीर चिंता हा महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा कृषी-राजकीय मुद्दा बनला आहे.ऊस उत्पादक शेतकरी वर्षभर अपार मेहनत करून पीक घेतात,परंतु अनेकदा कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला वेळेवर किंवा पूर्ण मिळत नाही.केंद्र सरकारने ठरवून दिलेली रास्त आणि किफायतशीर किंमत अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेत देत नाहीत.नियमानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत ही रक्कम मिळणे बंधनकारक आहे.अनेकदा कारखान्यांच्या काट्यावर उसाचे वजन कमी दाखवले जाते,असा शेतकऱ्यांचा आरोप असतो.वर्तमानात सहकारी बँकेची निवडणूक सुरू असून त्यात सोयरेशाही निर्माण केली जात निवडणूक बिनविरोध करण्याचे षड्यंत्र केले जात आहे.शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज 2 हजार 100 कोटी असताना जिल्ह्यातील 12 साखर कारखानदारांनी एकूण 2 हजार 7 00 कोटी कर्ज घेऊन ही बँक कोणाची आहे हे दाखवले असून शेतकऱ्यांचे तोंड काळे केले आहे.आणि बँक कोणासाठी बिनविरोध करायची आहे हे उघड झाले आहे.त्यांच्या आता चौथ्या पिढ्या राजकारणात आल्या आहेत.ते साखर कारखाने व आणि बँकेतून स्वतःची मालमत्ता निर्माण करत आहे.शेतकऱ्यांना त्याचा कवडीचा फायदा होत नाही असे स्पष्ट झाले आहे.आजही शेतकऱ्याना सन-2029 चा एम.एस.पी.दिला जात असून हे अन्याय कारक असल्याचे सांगितले आहे.सरकार याच लुटारूंना साथ देत असल्याचा आरोप केला आहे.शेतकऱ्यांना आजही स्वतःच्या दुचाकीचे पंक्चर काढता येत नाही आणि नेत्यांचे दिवटे कोट्यवधी रुपयांच्या गाडीत फिरत असल्याचे दिसून येत असून ही दरी शेतकरी जागे झाले नाही तर अजून वाढत जाणार असल्याचे सांगितले आहे.उसाच्या रसातील साखरेचे प्रमाण (रिकव्हरी) कागदोपत्री कमी दाखवून टनामागे मिळणारा भाव कमी केला जात आहे.हे कमी की काय वाहतूक,ऊस तोडणी मजूर आणि मुकादम यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि कारखान्यांकडून या खर्चाचे अवास्तव कपात यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.वेळेवर ऊस न तुटल्यामुळे शेतातच ऊस वाळून जातो,ज्यामुळे त्याचे वजन घटते आणि शेतकऱ्याला थेट आर्थिक फटका बसत आहे.शेतीचे पाणी उद्योगाकडे वळवले गेले आहे.हे कमी की काय आता रासायनिक कारखान्यांना कृषी लागवडयोग्य जमिनीत परवानग्या देऊन भूजल दूषित करण्याचे पाप केले जात असून शेतकऱ्यांच्या हाका आणि वेदना कोणालाही ऐकू येत नाही.हा असंतोष व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना दमबाजी केली जात असून त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी केल्या जात आहे.हा माज या उद्योजकांना कुठून आला आहे.शिवाय या कारखानदारांचे दिवटे या भूजल दूषित करणाऱ्यांना पाठीशी घालत त्यांचे वाढदिवस साजरे करत आहे.ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.त्यामुळे असा बेताल कारखानदारांना या परिसरातून हाकलून देण्याची गरज निर्माण झाली आहे.आणि त्यासाठी या भूजल दूषित करणाऱ्यांना शेतकरी संघटना हाकलून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन ॲड.काळे यांनी उपस्थत शेतकऱ्यांना दिले आहे.त्याचे शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.आज शेतकऱ्याच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार होत नाही ही दरी कशी संपवणार आहे याचे उत्तर हे नेते देणार आहे का ? असा कटू सवाल त्यांनी विचारला आहे.शेतकऱ्यांना जोपर्यंत ०५ हजार ५०० रुपयाचा दर प्रतिटन दिला जात नाही तो पर्यंत साखर बाहेर पडू दिली जाणार नाही.शेतकरी संघटनेने गेली अडीच वर्षापूर्वी पश्चिम सह्याद्रीच्या घाटमाथ्याचे पश्चिम समुद्राला वाहून जाणारे ११५ टी.एम.सी.पाणी उर्ध्व गोदावरी नदीत पाणी वळविण्यासाठी नानासाहेब जवरे,रुपंद्रे काले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून पाणी वळविण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे नगर-नाशिक वाद संपणार असून मराठवाड्याला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.त्यामुळेच आता राज्यातील आणि या भागातील मंत्री,नेतेमंडळी यावर नाईलाजाने पिपाण्या वाजवत फिरताना दिसुन येत असल्याचे शेवटी सांगितले आहे.

यावेळी शेतकरी संघटनेची नाटेगाव येथील स्थानिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून कैलास साईनाथ मोरे,उपाध्यक्ष ऋत्विक मारुती मोरे,सचिव राहुल किसन मोरे,उपसचिव गणेश दिलीप मोरे,तर सदस्य पदी शशिकांत दगु मोरे,भगवान सुरेश मोरे,विकास अशोक मोरे,भरत सुभाष मोरे,समाधान विनायक मोरे,गणेश अप्पासाहेब मोरे आदींची निवड जाहीर केली आहे.त्यांचा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी,”कोपरगाव तालुक्यात आगामी काळात शेतकरी संघटना ॲड.अजित काळे यांनी नेवासा,श्रीरामपूर तालुक्यात शेतकरी संघटना जोमाने वाढवली आहे.तर शेतकरी संघटना आगामी काळात कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांचे नेतृत्वाखाली जोमाने वाढणार असल्याचे सुतोवाच केले आहे.त्यांनी हातात घेतलेला लढा कधीही वाया जात नाही अशा आशावाद व्यक्त करून नाटेगाव येथील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या संघटनेचे कौतुक केले आहे.व त्यांच्या भूजल दूषित होण्याचे षडयंत्र ते संपवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली आहे.तर नानासाहेब गाढवे यांनी ॲड.अजित काळे,प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले ही निःस्वार्थ त्रिमूर्ती या लढ्यात असल्यावर कोणतेही काम अपूर्ण राहणार नसल्याचे सांगून त्यांचा आपल्याला अनुभव आला असल्याचे सांगून उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

यावेळी प्रारंभी ॲड.अजित काळे यांचे हस्ते व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश नामदेव बोरजे यांनी केले आहे.त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली असून शेतकऱ्यांचे कसे नुकसाने होत आहे याची यादी वाचून दाखवली आहे.तर रासायनिक अभियंता जयकुमार जाधव यांनी दूषित पाण्याचे कृषिक्षेत्रावर कसे दुष्परिणाम होत आहे हे सप्रमाण सांगितले असून शेतकऱ्यांचे डोळे उघडवले आहे.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब मोरे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार विकास मोरे यांनी मानले आहे.



