जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव घरफोडी,ऐवज गायब,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या बँक कॉलनीत रहिवाशी असलेल्या मात्र सध्या घरास कुलूप लावून बाहेरगावी असलेल्या प्रकाश माधवराव नवले यांचे घराचे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून त्यातील १० हजार रुपये किमतीचा ४३ इंची एल.ई.डी.जुना वापरता दूरदर्शन संच व १ हजार ४०० रुपये किमतीच्या जुन्या दोन गॅस टाक्या असा ११ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याची फिर्याद घर मालकाचे भाऊ प्रदीप माधवराव नवले (वय-६५) रा.टाकळी नाका खिर्डी गणेश शिवार यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असल्याने नजीकच्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रकाश नवले हे आपल्या घराला कुलूप लावून कुटूंबासमवेत मुलाकडे राहायला गेले असताना काल रात्रीच्या सुमारास घरी कोणी नाही हि संधी साधत अज्ञात चोरट्यानी रात्री बारा वाजे नंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील चिजवस्तूंची उचकपाचक करून त्यातील १० हजार रुपये किमतीचा ४३ इंची एल.ई.डी.जुना वापरता दूरदर्शन संच व १ हजार ४०० रुपये किमतीच्या जुन्या दोन गॅस टाक्या असा ११ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, सध्या कोरोना साथीने शहर व तालुक्यात थैमान घातले आहे.त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातांना एकीकडे काम नाही.तर काहींना व्यवसाय नाही. जे नोकरीस आहे त्यांना वेतन नाही अशी प्रतिकूल परिस्थिती ओढवली आहे.सामान्य नागरिकांना आपल्या हातातोंडाची गाठ पडणे अवघड बनले आहे.अनेकजण आपल्या नातेवाईकांकडे जाऊन तेथे थांबून कोरोना साथ जाण्याची वाट पाहत आहे.असेच एक कुटुंब म्हणून प्रकाश नवले हे आपल्या घराला कुलूप लावून कुटूंबासमवेत मुलाकडे राहायला गेले असताना काल रात्रीच्या सुमारास घरी कोणी नाही हि संधी साधत अज्ञात चोरट्यानी रात्री बारा वाजे नंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील चिजवस्तूंची उचकपाचक करून त्यातील १० हजार रुपये किमतीचा ४३ इंची एल.ई.डी.जुना वापरता दूरदर्शन संच व १ हजार ४०० रुपये किमतीच्या जुन्या दोन गॅस टाक्या असा ११ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला केला आहे.हि बाब सकाळी नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आली व त्यांनी घरमालक प्रकाश नवले यांच्या टाकळी फाट्यानाजीक राहणारे भाऊ प्रदीप नवले यांना त्याची माहिती दिली.त्यांनी या घटनास्थळाकडे धाव घेऊन या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेची खबर केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.न.५५२/२०२० भा.द.वि.कलम.४५७,४५४,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close