कृषी विभाग
कुंभारी परिसरात खरीप पिकांचे पावसाने झाले नुकसान
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कुंभारीसह सर्वदुर शहरी ग्रामीण भागात २३ जुलै रोजी दुपारी व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, मका,ज्वारी,बाजरी या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.सोयाबीन फसवणूक दुबार पेरणी कोरोणाचे संकट व निसर्गनिर्मित अवेळी पाऊसाचा फटका यामुळे क्रृषी विभागाने त्वरीत पंचनामे करावे यासाठी आ आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे अशी मागणी कुंभारी ग्रामपंचायत सरपंच प्रशात घुले उपसरपंच दिगंबर बढे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
शेती उत्पादन यांचे कोसळलेले भाव केंद्र सरकारचे शेती बाबत चुकीचे धोरण खते बियाणे यांची टंचाई कर्ज देण्याबाबत बॅन्काची उदासीनता शिर्डी मतदारसंघातील खा.सदाशिव लोखंडे यांचा ग्रामीण भागात नसलेला जनसंपर्क यामुळे शेतकऱ्यांना वालीच कोणी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.यामुळे शासकीय अधिकारी यांच्यावर देखील फारसा वंचक राहिला दिसत नाही. तरी आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी कचेश्वर रोकडे नानासाहेब चौधरी, दिपक चौधरी,उल्हास काळे, वसंत घुले,ललित निलकंठ यांनी केली आहे.