कोपरगाव तालुका
कोपरगाव नजीक रस्त्याचे काम झाले निकृष्ट

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरानजीक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नुकताच करण्यात आलेल्या टाकळी नाका ते टाकळी या डांबरी रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार कोपरगाव मनसेचे शहराध्यक्ष सतिश काकडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाढे यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टाकळी नाका ते टाकळी असा डांबरी रस्ता नुकताच करण्यात आला असून तो रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा झालेला आहे.तो रस्ता अनेक वर्षानंतर झालेला असून त्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढत आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की,सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टाकळी नाका ते टाकळी असा डांबरी रस्ता नुकताच करण्यात आला असून तो रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा झालेला आहे.तो रस्ता अनेक वर्षानंतर झालेला असून त्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढत आहे.तसेच रस्त्याला साईडपट्टी नाही,रुंदीचे प्रमाण नाही. दगडाची पिचींग नसून डांबराचा थर तर कुठच दिसत नसून तो रस्ता जुना आहे की नवीन हेच कळत नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वाकचौरे व गाडे यांना गुरुवार दि २३ जुलै रोजी फोन करुन रस्त्या संदर्भात विचारणा केली असता तेथे येतो असे सांगुन ते आलेच नसून त्यांनी वेळकाढूपणा केला आणि या विषयावर कांहीच बोलण्यास तयार नसुन या रस्त्यामुळे जनतेची सरळ सरळ फसवणुक होत असून या रस्त्याच्या कामात लाखो रुपयाचा घोटाळा झालेला समोर येत आहे.सदर रस्ता त्वरीत पुन्हा व्यवस्थीत करण्यात यावा अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा काकडे यांनी दिला आहे.या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे,तालुकाध्यक्ष अलिम शहा,उपशहराध्यक्ष अनिल गाडे,विजय सुपेकर,रघुनाथ मोहिते,संजय चव्हाण,संजय जाधव, बंटी सपकाळ,नितिन त्रिभुवन,जावेद शेख,सचिन खैरे,सागर महापुरे,आनंद परदेशी,जाधव,बापू काकडे,नवनाथ मोहिते,यांच्या सह्या आहेत.