कोपरगाव तालुका
..या ग्रामपंचायतीचे इमारत भूमिपूजन संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे जनसुविधा योजने अंतर्गत खोपडी ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
शासनाच्या जन सुविधा योजने अंतर्गत ग्रामिण भागात दहन अथवा दफन भुमीची व्यवस्था करणे,त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपन व भिती घालणे, विद्युतीकरण,आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी,पाण्याची सोय,स्मृती उद्यान,स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी इत्यादी कामे, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामे.यात ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत इमारत नाही अशा ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम,या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रामपंचायत इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे,इमारती भोवती कुपंण घालणे,आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे आदी कामे घेता येतात.मंजूर ग्रामपंचायतीला कार्यालय सुस्थितीत नव्हते.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी खोपडी करण्यात आला आहे.त्याचे भूमिपूजन एक करण्यात आले आहे.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे, कोपरगाव पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,आदिनाथ वारकर,बाळासाहेब जाधव,बाळासाहेब वारकर,उपसरपंच शिवाजी वारकर,संतोष ठुबे,बाबासाहेब जाधव,रोहिदास जाधव,प्रमोद रायते आदी मान्यवर उपस्थित होते.