संपादकीय
सामान्य माणसाला गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक ?

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील नवीन आय.टी.आय.इमारतीसमोर काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश दत्तात्रय मोरे यांचे सह अन्य साथीदारांवर झालेल्या हल्याचे तीव्र पडसाद उमटले असून यातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी प्रमुख मागणीसाठी आज कोपरगाव शहरात हिंदू समाज बांधवांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा आणत आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत तर व्यापारी वर्गाने या बंदमध्ये सकाळी ११ पर्यंत सहभाग नोंदवला आहे.मात्र यातील वास्तव मात्र वर्तमानात सामान्य माणसाला आता गुन्हेगारांपेक्षा वाईट वागवले जात आहे हे नवे राजकीय वास्तव आता समोर येत आहे.त्यामुळे सुज्ञ व्यक्तींनी याचा विचार करायलाच हवा.

शहराच्या वारंवार होणाऱ्या या हाणामारीच्या घटना राजकीय आश्रय असल्याशिवाय होऊ शकत नाही हे उघड सत्य आहे.वरील घटनेत तर मारणारे सत्ताधारी गटाचे खास तर मार खाणारे कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी (?) भाजपचे जवळचे मानले जातात तर मध्यस्ती करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आतील गोटातील मानले जात आहे यातच सर्व काही आले आहे.याला जातीयवादी रंग देण्यात काही हासिल होणार असे दूरदूरपर्यंत दिसत नाही.
कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था वर्तमानात धोक्यात आली आहे.अवैध गुटखा,अवैध वाळू,अवैध गोवंश हत्या,रेशन घोटाळा आणि अन्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.यातून या गुन्हेगारांचे मनोबल मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.त्यातून लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.शिवाय यातील दोन टोळ्यामधील गुन्हेगारांनी दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी गंगाकाठी स्वामी समर्थ मंदिरासमोर भररस्त्यात दिवसा ढवळ्या एकमेकावर गोळीबार झाल्याचे या शहराने विधानसभा निवडणुकीआधी पाहिले आहे.निवडणुकीनंतर या वातावरणात अद्याप काडीचा फरक पडलेला नाही.वरील धंदे अद्यापही राजरोस सुरू आहे.गावठी कट्टे तर ग्रामीण भागातही गल्लोगल्लीत काही हजारात भेटत आहेत.त्यातून अनेक तरुणाचे हकनाक बळी जात आहे.कोपरगाव तालुक्याच्या नैऋतेकडील एका तरुणाची आत्महत्या आणि शिर्डीतील घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे.या घटना राजकीय आश्रय असल्याशिवाय होऊ शकत नाही हे उघड सत्य आहे.वरील घटनेत तर मारणारे सत्ताधारी गटाचे खास तर मार खाणारे कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी (?) भाजपचे जवळचे मानले जातात तर मध्यस्ती करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आतील गोटातील मानले जात आहे यातच सर्व काही आले आहे.याला जातीयवादी रंग देण्यात काही हासिल होणार असे दूरदूरपर्यंत दिसत नाही.मोर्चेकरांचे केवळ घसे मोकळे होतील वेगळे काहीही होणार नाही हे तालुका आणि शहरातील राजकीय जाणकरांना एव्हाना नक्कीच कळले असेल.

कायदा सुव्यवस्था हा विद्यमान प्रतिनिधी आणि प्रशासनाचे प्रमुखांच्या अखत्यारीत विषय असताना त्यांना याला आवर घालता येत नाही हे म्हणणे निव्वळ भाबडेपणा.मात्र या अवैध व्यवसायातून मिळणारा पैसा आणि निवडणुकीत होणारा या गुंडाचा वापर हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.ही बिहारी आणि उत्तर प्रदेश छाप राजकारणाची लागण आता कोपरगावसह महाराष्ट्रात आली असे म्हंटले तर वावगे ठरू नये.
दरम्यान शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी एक बरे केले कोपरगाव शहर बंद ठेवून विनाकारण सामान्य माणसाला वेठीस धरले नाही हा चांगला निर्णय झाला आहे.यातून व्यापारी आणि सामान्य माणसांचा कारण नसताना बळी जात आहे.कायदा सुव्यवस्था हा विद्यमान प्रतिनिधी आणि प्रशासनाचे प्रमुख यांच्या अखत्यारीत विषय असताना त्यांना याला आवर घालता येत नाही हे म्हणणे निव्वळ भाबडेपणा ठरेल वेगळे काही नाही.मात्र या अवैध व्यवसायातून मिळणारा पैसा आणि निवडणुकीत होणारा या गुंडाचा वापर हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.ही बिहारी आणि उत्तर प्रदेश छाप राजकारणाची लागण आता महाराष्ट्रात आली असे म्हंटले तर वावगे ठरू नये हे उत्तम.नगर आणि नंतर शिर्डी हे आधी याचे मॉडेल मानले पाहिजे.एरव्ही साखर पट्ट्यात ही लस दुसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व केलेल्या राजकारणी नेत्यांत निश्चिंत नव्हती.मात्र तिसरी पिढी मात्र आता या पासून दूर राहील असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.वाळू ठेके घेणे,थैल्या घेऊन पदाधिकारी नेमणे,ठेकेदारित कमिशन हाणने,अधिकाऱ्यांच्या पैसे (थैल्या) घेऊन बदल्या करणे,आपल्याच कार्यकर्त्यांची जिरवणे यात ही पिढी महिर मानली पाहिजे आणि यात यांना कशाचा कमीपणा अथवा लाज,शरम वाटत नाही.अशा स्थितीत असे उपटसुंभ शहरात निपजत असतील तर ही या व्यवस्थेचे देणं मानली पाहिजे.अन्यत्र भाजप महायुतीच्या विरुध्द अल्पसंख्याक समाज सरळसरळ विरोधात गेला होता.मात्र यावर आमच्या प्रतिनिधीने बिग फोडल्यानंतर येथील नेते मंडळी सावध झाली होती व त्यांनी या समाजाला आपले करून आपले मतांचे मोठे इमले उभारले यात शंकाच नाही आणि विशेष म्हणजे ते यशस्वी झाले हे वेगळे सांगणे न लगे.त्यामुळे आता या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांचे अडचणींचे दूरध्वनी उचलण्याची गरज वाटत नाही हा या निवडणुकीचे आणि मोठ्या मताधिक्याचे परिणाम आता समोर येत आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील ७-८आरोपी हे कळसूत्रे बाहुले असून मुख्य आरोपी हा सत्ताधारी गटाचा समर्थक असून तो गुटख्यासह,मटका,रेशन घोटाळ्यातील धंद्यात आता नामचीन बनला असून त्याने आपले चेले पुढे करून ही घटना घडवली असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.त्याच्या मुसक्या पोलिस आवळणार का ? हा खरा सवाल आहे.
दरम्यान खबर तर आता अशी आहे की,आता ईशान्य गड आणि पश्चिम गडाचा सहमतीचा नवीन राजकीय पॅटर्न कोपरगाव तालुक्यात आणि शहरात उदयाला येत असून सरकारी निधी आता दोन्ही गटांनी (गडांनी ) ५०/५० टक्के वाटून घेण्याचे ठरवले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.त्याचाच हा परिपाक दिसून येत असून या दुर्घटनेतील ठेकेदार हा ईशान्य गडाचा असल्याचे उघड उघड दिसत आहे हा त्याचा सबळ पुरावा मानला जात आहे.त्यामुळे आता डोकी फोडणारी आणि फोडून घेणारी आणि मध्यस्थी करणाऱ्यांनी आता आगामी काळात विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.तर आंदोलन करणाऱ्यांनी आपण कोणाचे जोडे उचलत आहे याचा नक्कीच विचार केलेला बरा.तात्पर्य या समाज व्यवस्थेत आता सामान्य नागरिकांना आता गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक मिळत आहे.याबाबत भारतीय घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटले होते की,”ज्या व्यवस्थेत आणि धर्मरचनेत कोट्यवधी लोकांना त्यांचा काही दोष नसताना गुन्हेगारांपेक्षा वाईट रीतीने वागवले जाते तेंव्हा तिचा अव्हेर करण्यात कोणताही अपराध नसतो.वर्तमान काळ असा आला आहे याचा शहर वासियानी नक्कीच विचार करायला हवा.भगवान श्रीकृष्ण यांनी म्हंटले होते की,”विश्र्वकल्याणाचा विचार करणे आणि त्यानुसार आचरण करणे म्हणजे धर्म आता तो तुम्हाला मोर्चा आणि त्यांच्या नेत्यांत सापडणे दुरापास्त आहे हे नक्की.मात्र धर्म आणि राजकारण यात गल्लत होत असल्याने असे प्रसंग गुदरत आहे हे नक्की.