जाहिरात-9423439946
संपादकीय

राज्यात मनसे व्यापणार हिंदुत्ववादी विचारांची राजकीय पोकळी, महामेळाव्याची जय्यद तयारी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी अभद्र युती केल्याने हिंदुत्ववादी मते नाराज झाल्याने राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत येत्या २३ जानेवारी रोजी राज्यातील मनसे सैनिकांचा महामेळावा आयोजित केला असून या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच कोपरगावसह राज्यात मनसेच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.कोपरगाव तालुक्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस कार्यकर्त्यानी चांगला प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे येत्या २३ जानेवारीकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले असले तर नवल नको.

राज्याच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी म्हणून भाजप-शिवसेनेची युती गत तीस वर्षापासून असल्याने व या निवडणुकी पूर्वीही ती अबाधित असल्याने निवडणुकीनंतर भाजप व सेनेचीच युती होणे अभिप्रेत होते मात्र सत्तेच्या हव्यासापायी आधी भाजप व नंतर सेनेची इतकी घसरगुंडी झाली कि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही.परिणामस्वरूप राज्यात भाजपशी चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या विरोधी विचारधारा असलेल्या आघाडीच्या नेत्यांशी सेना नेतृत्वाने आधी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु केले. परिणामस्वरूप त्याचे पर्यवसान हि तीस वर्षाची युती तुटण्यात झाले आहे.त्यामुळे राज्यात हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, राज्याच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.त्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा सेनेस 64 जागा तर राष्ट्रवादीस ५४ जागा तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.वास्तविक या निवडणुकीत हिंदुत्ववादी म्हणून भाजप-शिवसेनेची युती गत तीस वर्षापासून असल्याने व या निवडणुकी पूर्वीही ती अबाधित असल्याने भाजप व सेनेचीच युती होणे अभिप्रेत होते मात्र सत्तेच्या हव्यासापायी आधी भाजप व नंतर सेनेची इतकी घसरगुंडी झाली कि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही.परिणामस्वरूप राज्यात भाजपशी चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या विरोधी विचारधारा असलेल्या आघाडीच्या नेत्यांशी सेना नेतृत्वाने आधी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु केले. परिणामस्वरूप त्याचे पर्यवसान हि तीस वर्षाची युती तुटण्यात झाले आहे.त्यामुळे राज्यात हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाला आहे.नेमकी तीच गोम वर्तमानात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली आहे.व भाजपाला पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारधारा असणारा प्रबळ सहकारी निर्माण करण्याचे काम भाजप नेतृत्वाने सुरु केले आहे.

भाजपाला पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारधारा असणारा प्रबळ सहकाऱ्यांची तीव्रतेने उणीव भासत आहे. त्या सहकाऱ्याला पुनर्जीवित करण्याचे काम भाजप नेतृत्वाने सुरु केले आहे. त्यातून मनसेला भाजप आर्थिक रसद पुरवू शकतो.नाहीतरी २००९ साली सेना-भाजपला रोखण्यासाठी त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी मनसेचा वापर केला होता व त्यावेळी मनसेला आर्थिक रसद पुरवून पुन्हा एकदा राज्यात सत्ता राखण्यात यश मिळवले होते हि बाब फार जुनी नाही हे येथे विसरता येणार नाही.राजकारणात कधी कोण कुणाला वापरून घेईल याचा भरवसा नसतो.ती कालपरत्वे एकमेकांची अपरिहार्यताही असते.

त्यातून मनसेला भाजप आर्थिक रसद पुरवू शकतो.नाहीतरी २००९ साली सेना-भाजपला रोखण्यासाठी त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी मनसेचा वापर केला होता व त्यावेळी मनसेला आर्थिक रसद पुरवून पुन्हा एकदा राज्यात सत्ता राखण्यात यश मिळवले होते हि बाब फार जुनी नाही हे येथे विसरता येणार नाही.राजकारणात कधी कोण कुणाला वापरून घेईल याचा भरवसा नसतो.ती कालपरत्वे एकमेकांची अपरिहार्यताही असते.आता नेमकी हीच संधी साधण्यात भाजप यशस्वी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.त्यात मनसेची पुरुज्जीवित होणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.त्यामुळे त्या दृष्टीने मनसेने आपली शस्रे बाहेर काढल्याचे मानले जात आहे.या राजकीय पार्श्वभूमीवर राज्यातील मनसे सैनिकांना राज ठाकरे यांनी आदेश दिले असून त्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.यात मनसे आपली हिंदुत्ववादी भूमिका जाहीर करण्याची शक्यता असून यात मनसे आपला हिंदुत्ववादी अजेंडा जाहीर करून आपला ध्वज बदलू शकतो.त्यातून शिवसेना आगामी निवडणुकांत पिछाडीला जाण्याची दाट शक्यता असून दूरदृष्टीने शिवसेना नेतृत्वाने आघाडीशी युती करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे.आज जरी त्यांना सत्तेचे गुलाबजामून गोड वाटत असले तरी दूरदृष्टीने विचार करता शिवसेनेला भविष्य वाईट असल्याचेच वर्तमानात तरी दिसत आहे.आज राज्यात भाजपाला हिंदुत्ववादी विचारांचा प्रबळ भिडूची आवश्यकता आहे.तर मनसेला आपण २००९ निवडणुकीत केलेली चूक पुन्हा दुरुस्ती करण्याची संधी काळाने दिली आहे.आता कोण या संधीचा कसा फायदा घेतो हे आगामी काळात दिसून येणार आहेच.

या पार्श्वभूमीवर राज्यात मनसेच्या बैठकांना उत आला असल्यास नवल नाही.राजकारणात संधी शोधून तिचा अचूक उपयोग करणाराच यशस्वी होत असतो. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.ती संधी आज तरी मनसेचे दार ठोठावत आहे.तर भाजपाची जवळच्या मित्राची भर त्यात पडून भाजपला पुन्हा एकदा कर्नाटकची पुरावृत्ती करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.आता काळच त्याचे उत्तर लवकरच देणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close