संपादकीय
भाजपच्या मुलाखतीत वहाडणेंना कौल !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली असतांना नगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच संपन्न झाल्या असून या मुलाखतीत कोपरगाव मधून घेतलेल्या मुलाखतीत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी उजवा कौल मिळाल्याचे विश्वसनिय वृत्त हाती आले आहे.असे झाले तर कोपरगावच्या राजकीय नेत्यांचा पार रंगाचा बेरंग होऊन जाईल हे नव्याने सांगायची गरज नाही.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी गत लोकसभा निवडणुकीत व नगरपरिषद निवडणुकीत ज्यांना पक्षाने आपल्या तात्कालिक फायद्यासाठी बाहेर काढले असे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना परत भाजप मध्ये घेण्याचा प्रस्ताव प्रदेश पातळीवर धाडला असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येणे हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून या धामधुमीत आता राऊतांची गोळाबेरीज करण्याचे काम प्रस्थापितांनीं सुरु केले असून नाल, मेख,तंग, तोबरा जमा करण्यास प्रारंभ केला आहे.मुलाखतीला विदर्भातील भाजपचे नेते तथा मुख्यमंत्रांच्या अंतर्गत गोटातील प्रमुख व प्रदेश सरचिटणीस आ. रामदास आंबटकर यांनी हजेरी लावली असून त्यानी आधी भाजपचे विद्यमान आमदार यांना संधी दिली असून त्या नंतर इतर इच्छुकांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.कोपरगाव तालुक्यात आमदारकी एक आणि इच्छुक चार अशी अवस्था झाली असून सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत एक फुल व चार माळी असा प्रसंग गुदरला आहे.
इच्छुकांमध्ये विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे,भाजपचे निष्ठावान व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,भापमध्ये अद्याप प्रवेश न केलेले मात्र तरीही बाशिंग बांधून बसलेले गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, आदी तिघे दिसत असले तरी प्रत्यक्षात रणात दिसत नसलेले व सध्या राष्ट्रवादीत आपले बस्तान मांडून असलेले व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आड लपलेले कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे आदी नावे प्रामुख्याने दिसत असले तरी त्यांच्या तालमीत तयार झालेले माजी स्वीय सहाय्यक प्रमोद लबडे आदी मोहरे दिसत आहे. तरी या शिवाय सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे हे हि आपली तलवार म्यान्यात घालुन उभे आहेत.तथापि काल संपन्न झालेल्या मुलाखतीत सत्ताधारी पक्षाची औपचारिकताच जास्त दिसून येत असली तरी लोकशाही देशात हे सोपस्कार सर्वच पक्षांना करावे लागतात हे जाणत्यांस सांगणे न लगे.तरीही या औपचारिकतेमुळे आगामी काळातील कोणत्या पक्षाची काय दिशा राहील हे हि त्या निमित्ताने समजून येते.त्यासाठी कालची घटना महत्वाची आहे हे नाकारता येत नाही.
काल झालेल्या मुलाखतीत खऱ्या अर्थाने उमेदवार यांनाच पाचारण केले होते तरी तेथे अन्य कार्यकर्तेही बहुसंख्येने उपस्थित होते.त्याला वहाडणे अपवाद नव्हते. मात्र त्यांना पक्ष निरीक्षक यांचेकडून मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी होताच.पण त्याच वेळेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी गत लोकसभा निवडणुकीत व नगरपरिषद निवडणुकीत ज्यांना पक्षाने आपल्या तात्कालिक फायद्यासाठी बाहेर काढले असेमाजी खा. भाऊसाहेब वाकचौरे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना परत भाजप मध्ये घेण्याचा प्रस्ताव प्रदेश पातळीवर धाडला असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येणे हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही.
विशेष म्हणजे भाजपने ते नगराध्यक्ष पदी निवडून आल्या नंतर त्यांच्या मुखपत्रात वहाडणे यांचे भाजपच्या निवडणून आलेल्या अध्यक्षांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.
तथापि राज्यसरकार अल्पमतात असताना त्यांना वहाडणे यांचे जास्तीचे चोचले पुरवणे हिताचे नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी सबुरी धरूनभाजपाची नौका पैलतिरास आणण्यास मोठी मदत केली आहे हे इथे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.कोपरगाव तालुक्यातील विद्यमान आमदाराने काय दिवे लावले ते आता विधानसभेत प्रश्न मांडणाऱ्या आमदारांच्या स्रेनिवरून उघड झाले आहेच.पाच वर्षात एक प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचा लौकिक या पेक्षा वेगळा काय असू शकतो.हे त्यांचे समर्थन करणाऱ्या अंध भक्तांना नक्कीच उमजले असेल.
आमच्या प्रतिनिधीने या बाबत वारंवार यांच्या कामाची पोलखोल केलेली आहेच व त्यांना उमेदवारी मिळण्याची सूतराम शक्यता नसल्याचे वारंवार स्पष्ट केलेले आहे.तरीही तालुक्यात विकासकामांची कोटींची -कोटींची उड्डाणे सुरु होती.व त्यावर विश्वास ठेवणारे त्यांकडे डोळे झाक करणारे त्यांचे पित्तेच होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.भाजपने गोपनियरीत्या केलेल्या तिन्ही सर्वेत कोपरगावची जागा धोक्यात आहे हे आमच्या प्रतिनिधीने वारंवार बजावले होते.त्याचे प्रत्यन्तर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधी याना नक्कीच येत असेल.कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगविण्याचे कधीच थांबत नाही मात्र कायमच स्तुतीपाठकांच्या गराड्यात असणाऱ्यांना हे समजणे शक्यच नव्हते.त्यामुळे या सत्ताधाऱ्यांनी आपले अपयश गृहीत धरून पुढील वाटचाल सुरु करून शिवसेनेच्या एका पाण्याशी संबंधित खात्याच्या राज्यमंत्र्याशी संधान साधून भाजप व सेनेची युती फिस्कटली तर सेनेकडून आपल्या उमेदवारीची सोय करून ठेवली आहे.असे असले तरी युतीची अभेदता लक्षात घेता सत्ताधारी वर्गाने मराठवाड्यातील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्रांशी संधान साधून ठेवले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.तथापि या चारही उमेदवारांनी भाजपच्या उमेद्वारीवर डोळा ठेवला आहे हे येथे उल्लेखनीय मानावे लागेल.आता प्रश्न असा उपस्थित होतो कि वहाडणे यांचा अपवाद सोडला तर प्रमुख तिन्हीकाँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार एके काळी भाजपाला अस्पृश्य मानत होते एवढेच नवे तर या पक्षाला जातीयवादी म्हणून हिणवत होते जाहीर सभांमधून भाजपला वाकुल्या दाखवत होते.मग आताच या पक्षाला एवढे मोहळ कसे लटकले ?
असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. त्यामागे अर्थातच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कष्ट .हा पक्ष स्थापन करून या पक्षाला आज जे चांगले दिवस आणले त्यात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.अर्थातच त्यांच्या नावाचे उच्चारण आताच करावयाचे कारण काय तर त्यांच्या नावाचा दबदबा अद्यापही राज्यभरात कायम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही,त्यांच्या हयातीत जे त्यांना कधीही किंमत देऊ शकले नाही ते आज भाजपकडे तिकिटा साठी रांगा लावून उभे आहेत.व स्वतःची पापे झाकण्यासाठी त्यांना भाजपाची वा शिवसेनेची उमेदवारी गरजेची वाटते.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.सूर्यभान पा. वहाडणे यांच्या नावाचा दबदबा अद्यापही राज्यभरात कायम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही,त्यांच्या हयातीत जे त्यांना कधीही किंमत देऊ शकले नाही ते आज भाजपकडे तिकिटा साठी रांगा लावून उभे आहेत.व स्वतःची पापे झाकण्यासाठी त्यांना भाजपाची वा शिवसेनेची उमेदवारी गरजेची वाटते.खरे तर आज या संधीसाधूंना खड्यासारखे पक्षाने लांब भिरकावून द्यायला हवे आहे मात्र राजकारणात बऱ्याच वेळा माणसाचा वापर करून झाला कि मग त्याचा काटा करण्याचा बेत करतात.कोपरगावात आता या निरुपयोगी नेत्यांचा त्याग करण्याची वेळ आली आहे.यांनी समाजासाठी नेमके काय केले हे जनतेने त्याना विचारण्याची गरज आहे.यांनी एकच चांगले काम केले आपल्या वस्त्यांकडे जाणारे व कारखानदारीकडे जाणारे रस्ते मात्र केले आहेत.उर्वरित तालुक्यात रस्ते कमी अन खड्डे जास्त असून त्यात होणाऱ्या अपघाताने अनेकांना जीवनातून उठावे लागत आहे.पण त्यांची ना कोणाला खंत ना सोयरसुतक.ज्याचे जाते त्यालाच या गोष्टी कळतात बाकी केवळ भारवाहु ठरतात. असो प्रश्न असा आहे कि नगरच्या मुलाखतीत नेमके काय झाले याची अनेकांना उत्कंठा आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता या मुलाखतीत विजय वहाडणे यांना संबंधित निरीक्षकांनी अत्यंत चांगली(चांगली या शब्दावर आक्षेप नको )वागणूक देऊन स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या स्मृतीस उजाळा दिला असून आपले पिताश्री व सूर्यभान पाटील वहाडणे यांनी विधानपरिषदेत सोबतच काम केले,शिवाय आपण त्यांना गुरुस्थानी मानतो,त्यांनीच राज्यात भाजपाची लागवड केली व त्यास पाणी घातले व वाढवले असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.त्यामुळे त्यांच्या सुपुत्राची आम्ही काय मुलाखत घेणार म्हणून थेट गौरव केला आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्यास नवल नाही.
विद्यमान लोकप्रतिनिधींच्या मुलाखती सकाळच्या प्रहरी झाल्या मात्र त्यात कोपरगावच्या मुलाखतीत मिठाचा खडा पडला म्हणतात.व निरीक्षकांच्या बोलण्यातून उमेदवारीबाबत नकारात्मक सूर येताच कोपरगावच्या नेत्यांनी,”तुम्ही उमेदवारी द्या, नाही तर न द्या, मी उभी राहाणारच!” असा सूर आळवला गेल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.गतवेळी भाजपाला बहुमत काठावर असल्याने आयारामांची गरज होती आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता पक्ष भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपवर बेगडी प्रेम करणाऱ्या व स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.या न्यायाने काँगेसमध्येच असलेले मात्र भाजपच्या उमेदवारीचे स्वप्न बघणारे राजेश परजणे यांचे उमेदवारीचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.भाजपाला हा पक्ष आयारामांचा हा पक्ष या प्रतिमेतून बाहेर पडायचे असून महाराष्ट्रात त्यांचे गत पाच वर्षात झालेले प्रतिमाहनन व शिस्तवान पक्ष हि प्रतिमेची डागडुजी करावयाची वाटली तर कोणास वावगे वाटायचे काम नाही.