जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

महसुलमंत्र्यांची कोपरगावला गोपनीय भेट,चर्चेला उधाण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थॊरात यांनी अचानक कोपरगावला भेट दिली असून त्यांनी काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा न करता थेट येसगावातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची वस्ती गाठून बंद खोलित चर्चा करून आल्या पावली पुन्हा संगमनेर गाठले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोल्हे यांच्या थोरल्या पातीच्या धाकट्या चिरंजीवांच्या काँग्रेस प्रवेशाच्या उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे आता काँग्रेस पासून सुरु झालेला कोल्हे परिवाराचा राजकीय प्रवास पुन्हा एकदा राजकीय आवर्तन पूर्ण करणार असल्याची चर्चा झडू लागली आहे.

आगामी कालखंडात जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेच पण त्या आधी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आहे.याकडे कोल्हे घराण्याचे लक्ष लागून आहे.मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर आता त्याची पुनरावृत्ती त्यांना टाळायची आहे.तर दुसरीकडे आपला तोट्यात चाललेला कारखाना.कामगारांचे होत नसलेले सहा-सहा महिन्यांचे पगार.त्यातील कामगारांना जाहीर करूनही दिलेला निम्माच दीपावली बोनस.हा त्यांच्या कारकिर्दीत खालावलेला राजकीय आलेख आता चांगलाच चर्चेत आहे.या खेरीज शिक्षण संस्थांची थकलेली नव्हे राज्य सरकारने मुद्दाम थकवलेली वेगवेगळी अनुदाने हि मोठी डोकेदुखी ठरलेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,माजी मंत्री यांनी आपला राजकीय प्रवास साधारण १९६२ कोपरगाव पंचायत सभापती पासून सुरु केला त्याला आता जवळपास आता सहा दशकांचा कालावधी उलटत आला असून आता त्यांची राजकीय वर्तुळात तिसरी पिढी कार्यरत झाली आहे.आधी त्यांनी १९७२ अपक्ष निवडणूक लढवून सिंहाची खून घेऊन विधानसभेचा राजकीय गणेशा केला होता.त्या नंतर त्यांनी कोपरगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हात धरून पुढील निवणूक लढवली होती.काँग्रेसचा हात त्यांनी तब्बल बावीस वर्ष पकडला होता.मात्र १९९९ साली विधानसभा निवडणुकी पूर्वी शरद पवार यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या परदेशी असल्याचा अचानक साक्षात्कार झाला होता.व त्यांनी त्या भांडणातून आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सवता सुभा निर्माण केला होता.त्यावेळी झालेल्या पहिल्या पत्रकार परिषेदेत एक कडक टोपीचा नेता आवर्जून होता.ते तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे हे होते.त्यावेळी त्यांना शरद पवार आपल्याला उचलून घेऊन आपले राजकीय पुनर्वसन करतील अशी मोठी अपेक्षा होती मात्र उत्तरोत्तर ती फोल ठरत गेली नाही म्हणायला त्यांना साई संस्थानचे उपाध्यक्षपद मिळाले पण ते खरेतर त्यांचा अपमान करण्यासाठीच होते.कारण त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन श्रीरामपुरचे तत्कालीन आ.जयंत ससाणे यांच्या सारख्या नवख्या व कनिष्ठ नेत्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनास्था प्रसंग मुद्दाम गुदरवला होता.मात्र तो अपमान त्यांनी पचवला होता.खरं तर त्या जागी पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या जागी आधी त्यांच्या स्नुषा यांचा विचार केला होता.त्यावरून या दोन्ही घराण्यात मोठा कलह झाल्याच्या त्यावेळी बातम्या होत्या.मात्र तरीही त्यांनी तो अपमान पचवला होता.रयत शिक्षण संस्थेच्या पद वाटपात त्यांना अवमानच हाती आला होता.नाही म्हणायला माजी खा.काळेंची तीच अवस्था होती.मात्र त्या भ्रमनिरासातून त्यांनी बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.मात्र पवारांनी त्यांना सन्मानाचे पद दिले नाही.त्यांनी काँग्रेस यामध्ये असताना दोन मुख्यमंत्र्यांना आपल्या दंडाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवल्या होत्या.मात्र त्यांना या लढाईत अपयश आले होते.अखेर त्यांनी ऑक्टोबर २०१४ ला अखेर या अवमानस्पद वागणुकीला कंटाळून अखेर आपल्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांना अखेर भाजपच्या बोट धरायला लावले. नाही म्हणायला त्यांनी शिवसेनेचा दरवाजा खटखटावला होताच.मात्र तो उघडलाच गेला नव्हता हि बाब अलाहिदा ! त्यामुळे अखेर लोकसभेत भाजपचा चौफेर उधळणारा अश्व पाहून भाजपाला जवळ केले होते.व गत दहा वर्षात शिवसेनेचे आ.अशोक काळे यांच्या कामाला वैतागून अखेर २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत नागरिकांनी माजी आ.कोल्हे यांना नव्हे तर भाजपला जवळ केले होते.कारण त्यांना दुसरा मार्गच नव्हता अशा वाटमाऱ्या करणाऱ्या सहकारातल्या टोळ्या राज्यात नव्हे तर देशात कार्यरत आहे.कारण त्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस याला मतदार जाम वैतागला होता.आता राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही.नाही म्हणायला मिळतेच पण शिवसेनेनें आयत्या वेळी भाजपच्या सासुरवासाला कंटाळून अखेर निवडणुकीत आपला मतदारांचा गल्ला पदरात पाडून घेतल्यावर सिंहासन काबीज करायच्या वेळी पेरले ते उगवते या न्यायाने उट्टे काढण्याची संधी शिवसेनेने सोडली नाही व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कळपात सामील होऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिडातील हवाच काढून घेतली.अशा वेळी कोपरगावात निळवंडेच्या पाण्याचा फुगा फुगवत नेऊन तो फुटेपर्यंत ताणवला गेल्याने मतदारांनी माजी आ.कोल्हे यांना त्यांची जागा दाखवून दिली.व त्यांना पराभव चाखवला गेला.आता या घटनेला वर्ष उलटले आले आहे.आता आगामी कालखंडात जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेच पण त्या आधी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आहे.याकडे कोल्हे घराण्याचे लक्ष लागून आहे.गत चार वर्षात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे गटाकडे वीस नगरसेवकांचे भरभक्कम बहुमत असतानाही त्यांना दाती तृण धरायला लावले आहे.त्यामुळे कोल्हे गटाचे वरिष्ठ नेते जाम वैतागले असून त्यांनी या नगरसेवकांना फैलावर घेऊनही आता पर्यंत वहाडणेंच्या विकासाची घोडदौड थांबवता आली नाही.मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर आता त्याची पुनरावृत्ती त्यांना आगामी दोन्ही निवडणुकांत टाळायची आहे.तर दुसरीकडे आपला तोट्यात चाललेला कारखाना.कामगारांचे होत नसलेले सहा-सहा महिन्यांचे पगार. त्यातील कामगारांना जाहीर करूनही दिलेला निम्माच दीपावली बोनस. हा त्यांच्या कारकिर्दीत खालावलेला राजकीय आलेख आता चांगलाच चर्चेत आहे.या खेरीज शिक्षण संस्थांची थकलेली नव्हे राज्य सरकारने मुद्दाम थकवलेली वेगवेगळी अनुदाने हि मोठी डोकेदुखी ठरलेली आहे.त्यामुळे या घराण्याची मोठी राजकीय समस्या निर्माण झाली आहेच.पण मूळ समस्या पुढेच आहे.

१९ फेब्रुवारी २०२० रोजी विधानसभेचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांची घरी वस्तीवर येऊन भेट घेतली होती.त्यावेळी त्यांनी अचूक संधी साधत कोल्हे यांनी आपल्या राहिलेल्या इच्छा अपेक्षांचे ओझे कमी करण्यासाठी काँग्रेस प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.त्यावेळी त्याना अनुकूल संधी दिसून आल्याने त्यांनी हि बाब आपल्या वरिष्टांच्या लक्षात आणून दिली आहे.व या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे.त्यातूनच प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा दौरा झाल्याचे दिसून आले आहे.गेला-मेला बाजार एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद,उपाध्यक्षपद किंवा विधानपरिषद मिळवून आपल्या संस्थानाला कवचकुंडले मिळवण्याचे उद्दिष्ट्य साधून घ्यायचे आहे.

मागील म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे तिकीट हे थोरल्या पातीला हवे होते त्यावरून घरात बरेच द्वंद्व झाल्याच्या बातम्या आहेत.त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत हि डोकेदुखी वाढलेली होती.त्यातूनच मोठा गृहकलह झाल्याच्या बातम्या आहेत.त्या मुळे आता थोरल्या पातीला व त्यांच्या घरातील लक्ष्मीला शांत करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.त्यातूनच माजी मंत्री कोल्हे यांना आता भरपूर वेळ उपलब्ध आहे.त्यातून या समस्येला दूर करण्यासाठी ते गप्प बसलेले नाही त्यांनी बसल्या जागीच विद्यमान काँग्रेसी मंत्र्यांना आपण आता आजारी असल्याने फिरु शकत नाही असे भावनिक आवाहन करून आपल्याला भेटण्याची इच्छा आहे.मात्र आपण भेटू शकत नाही आपण वेळ मिळेल त्यावेळी भेट घ्यावी म्हणून अनेक मंत्र्यांना वारंवार पत्रव्यवहार केले आहे.त्यातून दोन डगरीवर हात ठेवण्याचा डाव रचला असल्याचे स्पष्ट होत आहे.त्याने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे कसब त्याना साध्य करायचे असल्याचे दिसून आले आहे.एका पातीला वैजापूरमधून आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवायचे आहे.त्याची चुणूक विधानसभा निवडणुकीनंतर एका थोरल्या पातीच्या युवराजाने नाटेगावजवळ असलेल्या नगर-मनमाड मार्गावर “टोल आंदोलन” करून आव्हान दिल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल.त्यातून हा गृहकलह आता शांत कारण्यासाठी आता एकास कुटुंबास भाजपात स्थिरस्थावर करायचे तर एका इच्छुकांस काँग्रेसवासी, हा डाव साध्य करायचा आहे.करून त्यातून एक पत्र कामी आले असून गत १९ फेब्रुवारी २०२० रोजी विधानसभेचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांची घरी वस्तीवर येऊन भेट घेतली होती.त्यावेळी त्यांनी अचूक संधी साधत कोल्हे यांनी आपल्या राहिलेल्या इच्छा अपेक्षांचे ओझे कमी करण्यासाठी काँग्रेस प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.त्यावेळी त्याना अनुकूल संधी दिसून आल्याने त्यांनी हि बाब आपल्या वरिष्टांच्या लक्षात आणून दिली आहे.व या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे.गेला-मेला बाजार एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद,उपाध्यक्षपद किंवा विधानपरिषद मिळवून आपल्या संस्थानाला कवचकुंडले मिळवण्याचे उद्दिष्ट्य साधून घ्यायचे आहे.त्यातूनच प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा दौरा झाल्याचे दिसून आले आहे.बंद खोलीत झालेल्या चर्चेत आता पुढील रणनीती ठरलेली दिसून येत आहे.याबाबत काँग्रेसला आता जिल्ह्यात बळ वाढवायचे आहे.व विखे विरोधी शक्ती एकत्र करून आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीत हे आपली ताकद पक्षाला दाखवून द्यायची आहे.त्यातून दोघांची राजकीय गरज भागणार असल्याचे दिसत आहे.याखेरीज शेवटी एक मुद्दा राहिलाच आता आपला ज्या कारणाने पराभव झाला आहे.ते कारण आता कायमचे मिटून टाकण्यासाठी महाआघाडीच्या जवळ जाऊन आपले इप्सित साध्य करण्यासाठी हि मंडळी अद्याप डूख धरून बसलेली आहे.तो मुद्दा “निळवंडे बंद जलवाहिणीचा” हे दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांनी विसरता कामा नये.हा विषय आता सर्वोच्च स्थानी जाऊन पोहचल्याने त्यासाठी तो निकाली काढण्यासाठी हि मंडळी सर्व पक्ष पार्ट्या विसरून आता एकत्र येत आहे.हे या दुष्काळी शेतकऱ्यांनी मुळीच विसरू नये अशी हि गोष्ट आहे.हा आटापिटा त्यासाठी सुरु आहे.आता शेवटची घटिका जवळ आली असल्याने हि मंडळी एकत्र येणे हा योगागोग नक्कीच नाही.हि विद्यमान आ.आशुतोष काळे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे हे त्यांना विसरता येणार नाही.आता त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल इतकेच !.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close