जाहिरात-9423439946
संपादकीय

शुक्राचार्यांच्या नगरीतील एरंडाचे गुऱ्हाळ …!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
        
  अ.नगर जिल्ह्यातील सावळीविहीर येथे नवीन एम.आय.डी.सी.निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.त्यामुळे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्यानंतर कोपरगाव तालुक्यात मोठे स्रेयाचे मोठे वादळ उठले असून यात भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उडी घेतली असून यात आपल्या प्रयत्नाला यश आल्याचा दावा केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

   

नवीन एम.आय.डी.सी.उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ठिकाण शिर्डी शहरापासून पाच किलोमीटर,समृद्ध महामार्गाच्या इंटरचेंजपासून केवळ तीन किलोमीटर व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे.रेल्वेमार्ग,रस्तेमार्ग तसेच हवाईमार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारी औद्योगिक वसाहत म्हणून भविष्यात उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल व रोजगार निर्माण व्हायला मदत मिळेल अशी सामान्य जनतेला अपेक्षा आहे.मात्र हि निवडणूक पूर्व घोषणा आहे हे जनतेने विसरता कामा नये.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या सलग व समतल जमिनीचा सुयोग्य वापर करताना त्यावर औद्योगिक विकास क्षेत्र निर्मितीसह आणि रोजगार वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु.व सावळीविहीर खु.तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीचा वापर करण्यात येणार असल्याचा सरकारने दावा केला आहे.

  वास्तविक हि आनंदाची घटना मानता येईल मात्र जनतेला कोणत्याही कामाचा आंनद हा मिळू द्यायचा नाही असा शिरस्ता वा चंग गत चाळीस वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील राजकीय प्रस्थापितांनीं अलिखितपणे आखून दिला असल्याचे वारंवार दिसून आले आहे.कोणतेही काम करायचे नाही पण अन्य संघटनांनीं केले तर त्याच्यावर आपला शड्डू ठोकायचा हे नेहमी ठरलेले आहे.त्यासाठी निळवंडे हे प्रातिनिधिक पण अर्धशतकाहून अधिकचे भले मोठे उदाहरण ठरले आहे.आता तर फ्लेक्स लावण्यात आणि जलपूजनात हि पाणीचोर मंडळी सर्वात पुढं आहे हे विशेष ! तीच बाब तालुक्यातील सिंचनासाठीच्या अकरा टी.एम.सी.व समन्यायी पाण्याची आहे.यात समन्यायी आमच्या मुले झाला याचे दायित्व हि मंडळी घ्यायला तयार नाही आणि भविष्यातही तयार होण्याची शक्यता नाही.उलट कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे कार्य लक्षवेधी असताना त्यांना हि मंडळी काम करूनही श्रेय मिळू देत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.गोदावरीच्या लाभक्षेत्रात कमीत कमी चार आवर्तने देऊ शकत असताना आपल्या दारू कारखान्यासाठी ती केवळ दोनवर रोखली आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात होणे गरजेचे असताना ती तेथे होऊ तर दिली नाहीच पण शेतकऱ्यांना साधे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बसू दिले नाही.बोलण्याची गोष्ट फार दूरची ठरली; यातच सर्व काही आले आहे.तीच रस्त्यांची आहे.प्रस्थापित नेत्याना साधे नगर-मनमाड,तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे बिगाऱ्याचे कामही या मंडळींना जमत नाही हे वास्तव वारंवार दिसून आले आहे.वर्तमानात वेगळी स्थिती नाही.काहीही न बोलता किती तरी सांगता येतं.वाणी आणि शब्द ह्यापेक्षा किती तरी पटीने मौनाचा शोध मोठा आहे.यांना कोणी सांगावे !

आमच्या प्रतिनिधीने एका बड्या नेत्याच्या वाढदिवशी लिहिलेल्या लेखात,”त्यांनी राज्यातील दोन मुख्यमंत्री हटवले असे वृतांत म्हटले होते.तर या महाशयांनी आमच्या प्रतिनिधीस पत्रकार परिषद बोलावून त्यात जवळ बोलावून दोन नाही तर तीन मुख्यमंत्र्यांना नारळ दिल्याचे अन्य पत्रकारांसमवेत मोठ्या भूषणाने सांगितले होते.एवढे यांचे बड्डपन ! मात्र तालुक्यातील जनतेला हे स्वच्छ पिण्याचे पाणी दिवसाला देऊ शकत नाही हि यांची मोठी शोकांतिका.

नाही म्हणायला हि मंडळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार,दिल्लीत,मुंबईत मोठमोठी पदे त्यांच्या नावावर नोंदवली गेली आहे.मध्यंतरी आमच्या प्रतिनिधीने एका बड्या नेत्याच्या वाढदिवशी लिहिलेल्या लेखात,”त्यांनी राज्यातील दोन मुख्यमंत्री हटवले असे वृतांत म्हटले होते.तर या महाशयांनी आमच्या प्रतिनिधीस पत्रकार परिषद बोलावून त्यात जवळ बोलावून दोन नाही तर तीन मुख्यमंत्र्यांना नारळ दिल्याचे अन्य पत्रकारांसमवेत मोठ्या भूषणाने सांगितले होते.एवढी यांचे बड्डपन ! मात्र तालुक्यातील जनतेला हे स्वच्छ पिण्याचे पाणी दिवसाला देऊ शकत नाही हि मोठी तालुक्याची शोकांतिका.शेती सिंचनाचा प्रश्न तर वेगळाच आहे.इंग्रजांनी दिलेले पाणी या महाशयांनीं काढून घेतले व उद्योगांना वाटून दिले आहे.उजनी साठी आज देव पाण्यात घालणारे नेते यांनी आज छातीठोकपणे या प्रकल्पासाठी किती योगदान दिले हे जाहीर करावे ! त्याचे उत्तर शून्य येईल.उलट यांनी किती अडथळे आणले हे विचारले पाहिजे.हीच स्थिती कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची आहे.आहे ते पाणी नागरिकांना देऊ शकले नाही.उलट येसगाव तलावातील त्या पाण्याची चोरी केलेली विजय वहाडणे यांनी माध्यमांसमक्ष उघड केली होती.व त्याचे व्हिडीओ उघड केले होते.त्याला फार दिवस झाले नाही.कालव्यातून कारखान्यास पाणी घेणारे गेट सडून गेले होते.एका साखरेच्या गोणीवर सर्रास त्यातून अवैध पाणी लाटले जात होते.एम.आय.डी.सी.हि काही वेगळी गोष्ट नाही.यातही त्यांनी श्रेयवाद आणला तर वेगळे वाटण्याचे काही कारण नाही.याची तालुक्यातील मतासाठी पैसे घेणाऱ्या लाचार जनतेला सवय झाली आहे.तालुक्यात किती स्वाभिमानी कार्यकर्ते आणि मतदार आहे हे सुक्ष्मदर्शी घेऊन शोधावे लागेल अशी स्थिती आहे.मात्र या लाचार फौजांमुळे शहर आणि तालुक्याचे अतोनात नुकसान होत आहे.याचे कोणालाही सोयरंसुतक नाही.वर्तमान एम.आय.डी.सी.मध्ये उद्योगप्रवण किती तरुणांना त्याचा पक्ष पार्टी न पाहता त्यांना रिकामे प्लॉट दिले जातात हे श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी जाहीर करावे,यातच सर्व काही आले आहे.तेथील प्लॉट किती शिल्लक आहे हे जरी जाहीर केले तरी या श्रेयवाद्यांना तालुक्यातील समाजसेवी संस्थांनी मोठे बक्षीस दिले पाहिजे.मात्र वास्तव तसे नाही.अनेकांनी आपल्या हाती सत्ता राखण्यासाठी त्यावर वेटोळे घातलेलं आहे.हे त्या औद्योगिक वसाहतीत कोणी तुमचा उद्योजक मित्र असेल तर त्याला जरूर विचारले पाहिजे.यांचे बेगडी प्रेम लगेच उघडे होईल यात तिळमात्र शंका नाही.एकदा विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग “जागा” कोणती ? ‘तो’ म्हणाला जी आपण,दुसऱ्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा.तिचा भाव करता येऊ शकत नाही.अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.यांना एखाद्याने सांगायची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे.

कोपरगावातील श्रेयावादी नेते आणि त्यांच्या मागील पैशाने विकली जाणारी जनता.

  

ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची व ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही,अशा लोकांसमोर तुमचे मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका हाच विजय वहाडणे यांना यातून बोध आहे.संपत्ती,सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते” हे महाभारतात दुर्योधनाने सांगून ठेवले आहे हे वास्तव वर्तमान पुढाऱ्यांनी विसरता कामा नये.

राहाता राहिला प्रश्न भाजपचे माजी शहराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रयत्नांचा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर घेतलेल्या सह्या अनेकांनी पाहिल्या असून लाखो तरुणांच्या त्यावर सह्या आहेत याला कोणाची साक्ष घेण्याची गरज नाही.त्यांनी तत्कालीन भाजप-सेना युतीचे उद्योगमंत्री अनिल देसाई,एम.आय.डी.सी.चे आयुक्त डॉ.पी.अन्बलगन यांना भेटून त्याचा पाठपुरावा केला होता.डॉ.अन्बलगन यांनी तसे शेतीमहामंडळाची ७०० एकर जागा असेल तर ती सुचवावी असे पत्र दिले होते.त्याचा वहाडणे यांचेकडे पुरावा आहे.वेळोवेळी त्यांनी तशा बातम्या दिल्या आहेत.मात्र वर्तमानात येणाऱ्या बातम्या,वर्तमान पत्रे आणि त्यांचे मालक किती विश्वासार्ह आहे हा यक्ष प्रश्न आहे.नेत्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून येणाऱ्या बातम्या श्रीमान-श्रीमतीसह फॉरवर्ड होतात.हीच बातमीदारीची नवी व्याख्या झाली आहे.अर्थातच त्याला आर्थिक मजबुरीची दुसरी काळी किनार आहेच हे सांगणे न लगे.तालुक्यातील एक नेता गुळाने मारतो तर दुसरा विषाने एवढाच काय तो यांच्यातील फरक.वास्तविक हे पश्चिम महाराष्ट्रातील चित्र आहे.

राज्यातील शेती महामंडळाच्या जमिनी शेतकरी सोडून इतर प्रयोजनांसाठी वापरता येणार नाही याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे हे येथे विसरता येणार नाही.

मध्यन्तरी माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या वाढदिवशी महसूल मंत्री विखे यांनी याच एम.आय.डी.सी.ला दुजोरा दिला होता.त्याला वर्षही झालें नाही.त्यावेळी विजय वहाडणे यांच्या कामाचे पुस्तक प्रकाशन झाले होते.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात एम.आय.डी.सी.बाबत वर्तमानात सुरु असलेला श्रेयवाद हे एरंडाचे गुऱ्हाळ आहे; त्यात काहीही विश्वासार्ह नाही हेच खरे ! यांच्या पत्रावर (चिठोरीवर म्हणणे योग्य होईल) एवढी कामे होत असतील व सत्तेत नसताना हि मंडळी इतकी कार्यप्रवण असतील तर मतदारांनी यांना कायमच विरोधी पक्षातच ठेवायला काय हरकत आहे ? याचा विचार नक्कीच करायला हरकत नाही.ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची व ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही,अशा लोकांसमोर तुमचे मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका हाच विजय वहाडणे यांना यातून बोध आहे.संपत्ती,सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते” हे महाभारतात दुर्योधनाने सांगून ठेवले आहे.याचा यांनी एक दिवस बोध घेतील तो कोपरगावकरांना सुदिन.

आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा….

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close