जाहिरात-9423439946
शैक्षणिक

न्यायिक लढ्यात डॉक्टरची भूमिका महत्वाची-…या न्यायमूर्तींची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   वैद्यकीय उपचारात आणि न्यायालयीन खटल्यात वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.बी.एम.पाटील यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“एडसग्रस्त रुग्णाची विशेष काळजी घेणे गरजेचे असून त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने उपचार दिले पाहिजे.एखादा रुग्ण एड्सग्रस्त असेल तर त्याची खरी माहिती लपवणे संयुक्तिक नाही.डॉक्टरच्या एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन उध्वस्त होवू शकते”-न्या.बी.एम.पाटील,जिल्हा व सत्र न्यायालय,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन होमिओपॅथी कॉलेज मध्ये नुकतेच तालुका विधी सेवा समिती,कोपरगाव वकील संघ व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने,’जागतिक एड्स दिना’चे औचित्य साधून कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश बी.एम.पाटील हे होते.

   सदर प्रसंगी कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर अतिरिक्त न्या.भगवान पंडित,अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए.एल वहाडणे,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अड्.एम.पी.येवले,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.इरशाद अली,होमिपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर,एस.जे.एस.हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.एस बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

   सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,एक चिकित्सक,वैद्यकीय व्यवसायी,वैद्यकीय डॉक्टर हा एक आरोग्य व्यावसायिक आहे जो औषधाचा सराव करतो,जो अभ्यास,निदान,रोगनिदान आणि उपचाराद्वारे आरोग्याचा प्रचार,देखभाल किंवा पुनर्संचयित करण्याशी संबंधित असतो,दुखापत आणि इतर शारीरिक आणि मानसिक दुर्बलता.वैद्य त्यांचा सराव काही विशिष्ट रोग श्रेणी,रूग्णांचे प्रकार आणि उपचार पद्धतींवर केंद्रित करू शकतात त्याबाबत ते विशेष म्हणून ओळखले जातात.”एडसग्रस्त रुग्णाची विशेष काळजी घेणे गरजेचे असून त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने उपचार दिले पाहिजे.एखादा रुग्ण एड्सग्रस्त असेल तर त्याची खरी माहिती लपवणे संयुक्तिक नाही.डॉक्टरच्या एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन उध्वस्त होवू शकते.न्यायालयात डॉक्टरची साक्ष खरी धरून न्याय दिला जातो.या न्यायालयाच्या प्रक्रियेत डॉक्टर महत्वाची भूमिका बजावत असतो.नियमानुसार एड्सग्रस्त व्यक्तीला उपचार देण्यापासून टाळाटाळ करू शकत नाही.असे आढळल्यास संबधित डॉक्टरवर कारवाई होते.उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की,”आपण पुढे शिक्षण घेवून डॉक्टर होणार आहोत.आपण सर्व नियम पाळले पाहिजे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची न्यायालयात महत्वाची भूमिका असतेव त्यावरून न्यायनिवाडा केला जात असतो याचे स्मरण त्यांनी करून दिले आहे.डॉक्टरांनी जे खरे असेल ते सांगावे कोणाच्या बाजूने बोलू नये खरी माहिती लपवू नये.जेणे करून अपराधी निरपराधी व निरपराधी अपराधी सिद्ध होईल असे वर्तन करू नये असे आवाहन शेवटी केले आहे.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे संस्थापक चांगदेव कातकडे यांनी केले तर सूत्रसंचालन होमिपॅथीक कॉलेजच्या विद्यार्थिनी श्रुती भिंगारे व पाजक्ता इथापे यांनी केले आहे.यावेळी प्राचार्य डॉ.नारायण पाटील यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close